जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '30 जूनलाच हात दाखवला, आत्मविश्वास होता म्हणून...', ज्योतिष्यावरून मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर

'30 जूनलाच हात दाखवला, आत्मविश्वास होता म्हणून...', ज्योतिष्यावरून मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर

'30 जूनलाच हात दाखवला, आत्मविश्वास होता म्हणून...', ज्योतिष्यावरून मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर

शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार यांनी शिंदेंवर टीका केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार यांनी शिंदेंवर टीका केली. ‘मी काही ज्योतिषी नाही. मुळात माझा ज्योतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही. आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांचा पलटवार ‘आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. काल माझ्यासोबत दोन मंत्री होते. सगळी मीडिया होती, काही लपून छपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

जाहिरात

‘दुसरा हात दाखवण्याचा विषय, आत्मविश्वास होता, म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले. महाविकासआघाडीचं सरकार कोणासोबत काम करत होतं? कुणासाठी सरकार चालत होतं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. 30 जूनलाच आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे. चांगला हात दाखवला आहे.’ आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, जे लपून छपून करतात त्यांची काळजी करा’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. कामाख्याच्या दर्शनाला जाणार ‘कामाख्या देवीला जाणार हे जाहीरपणे सांगितलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊन हे सरकार आम्ही स्थापन केलं आहे. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही’, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात