मुंबई 23 सप्टेंबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटातला संघर्ष वाढला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. यासाठी आज कोर्टात सामना रंगणार आहे. मात्र, हा मुद्दा कोर्टात असतानाच शिंदे गटानं इकडे दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थिती लावणार असल्याची चर्चा समोर येत आहे. राजनी ऐकलं, पण शिंदेंना कायद्याचा फायदा! बाळासाहेबांच्या फोटोवरून शिंदे गटाचं उद्धवना प्रत्युत्तर दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.यातच मेळाव्याला शिंदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आमंत्रणाची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांचा दौरा अचानक वाढला आहे. अशी चर्चा आहे की दसरा मेळाव्याला मोदी आणि शहांना आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा वाढला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता मेळाव्यात शिंदे गटाच्या मंचावर मोदी किंवा शाह दिसणार का? अशी चर्चा रंगली आहे. या मेळाव्यात थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना आणण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी आणि शाह यांनी हजेरी लावली तर हा मेळावा यावेळी नक्कीच वेगळा ठरणार आहे. Uddhav Thackeray : शिवाजी पार्क मिळालं नाही तर… उद्धव ठाकरे कारवर उभं राहून करणार भाषण! शिवसेनेनं दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवतीर्थावर तयारी सुरू केली आहे. पण, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट पडले आहेत. शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच आता शिंदे गट पूर्ण तयारीला लागला असल्याचं समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.