सातारा, 21 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील दोन पुलांसाठी तब्बल 450 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसागर जलाशयावर बामणोली ते दरे, आपटी ते तापोळा व तापोळा ते आहीर या तीन भागांवर पूलांची उभारणी केली जाणार आहे. कोयनेसह भागातील 105 गावांसह कांदाटी खोऱ्यावर मुख्यमंत्री मेहरबान झाल्याने या गावांचा दळणवळणासह सर्वच गोष्टींचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे कांदाटी गावचे असल्याने हे कोयना खोऱ्यात येथे ते या गावचे सुपुत्र असल्याने या खोऱ्यात विकासाची चालना मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी शिवसागर जलाशयावर सेतूची निर्मिती करून कोयना भाग 105 गावांसह कांदाटी खोऱ्यातील 16 गावांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली काढला. शिवसागरवरील सेतूमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील आहीर ते तापोळा यादरम्यान विव्हिंग प्रेक्षक गॅलरीसह भव्य असा पूल उभारण्याचे काम सध्या सुरु झाल्याची माहिती दैनिक पुढारीने दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन गेलो होतो पण..,, गुलाबराव पाटलांचा मोठा खुलासा
मागच्या काही काळात मुख्यमंत्री शिंदे हे देवदर्शनासाठी गावी आले होते. त्यावेळी भागातील ग्रामस्थांनी तापोळा ते आपटी यादरम्यान पूल झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. गेली अनेक वर्षे पिंपरी ते शेंबडी दरम्यानचा कांदाटी खोऱ्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पूल उभारण्याची मागणी होत होती. या दोन मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून कोयना भाग 105 गावांसह कांदाटी खोऱ्यातील जनता करत होती.
या दोन्ही पुलांबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय हरिश्चंद्रराव मोरे यांच्याकडून घेतली. ही सर्व माहिती कागदपत्रांसह संजय मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.
हे ही वाचा : 'हे गद्दारांचं सरकार, शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री'; मध्यावधी निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं भाकित
यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा मोरे यांनी केल्याने ना. शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी या दोन्ही पुलांना मंजुरी दिली. आपटी ते तापोळा या पुलासाठी 150 कोटी रुपये व सातारा, कास, बामणोली ते दरे यादरम्यान शिवसागर जलाशयावर केबल स्टे पूल बांधकाम पेव्हींग गॅलरीसह करण्यासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले.
या महत्त्वाकांक्षी पुलांसह बामणोली, तापोळा, कांदाटी खोरे या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बहुतांश रस्ते खडीकरण, डांबरीकरणासह मंजूर करण्यात आले आहेत. तापोळा ते महाबळेश्वर रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण याकरता निधी मंजूर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Eknath Shinde, Satara, Satara (City/Town/Village), Satara news