मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाणे पालिकेची क्लार्कला फेरीवाल्यांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन पडले भारी, जावे लागली घरी!

ठाणे पालिकेची क्लार्कला फेरीवाल्यांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन पडले भारी, जावे लागली घरी!

एवढंच नाहीतर विवेक महाडीक यांच्या शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता.

एवढंच नाहीतर विवेक महाडीक यांच्या शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता.

एवढंच नाहीतर विवेक महाडीक यांच्या शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता.

ठाणे, 04 ऑगस्ट : एका फेरीवाल्याने सहाय्यक अधिकारी कल्पिता पिंपळे (kalpita pimple attack) यांच्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण पालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि फेरीवाले यांचं साटंलोटं कसं होतं याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.  ठाणे महानगरपालिकेने नौपाडा अतिक्रमण विभागातील क्लार्क विवेक महाडिक (Clark Vivek Mahadik suspended) यांना निलंबित केला आहे. याच क्लार्कचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांनी साजरा केला होता.

विवेक महाडिक या क्लार्कचे फेरीवाल्यांसोबत जवळचे संबंध आहे. एवढंच नाहीतर विवेक महाडीक यांच्या शासकीय कार्यालयात येऊन फेरीवाल्यांनी विवेक महाडिक यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता. वाढदिवसाचे फोटो न्यूज18 लोकमतच्या हाती लागलs असून या फोटोवरून स्पष्टपणे दिसते की, अधिकारी आणि फेरीवाले यांचे नेक्सस किती खोलवर रुतलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी हा दावा केलाय की, 'त्यांनीच हा फोटो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना दिला होता आणि या फोटोच्या आधारित ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बिपीन शर्मा यांनी विवेक महाडिक या क्लार्कवर कारवाई केलेली आहे.

अवघ्या 717 रुपयांचा होता शेअर, आज गुंतवणूकदारांनी कमावले डब्बल!

कल्पिता पिंपळे या सहाय्यक अधिकारी आहेत. कासारवडवली येथे फेरीवाल्यांवर ती कारवाई करण्यास त्या गेल्या असताना त्यांच्यावर अमरजीत यादव नावाच्या फिरवल्याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यात त्यांना आपली दोन बोटे गमवावी लागली आहेत तर याच हल्ल्यांमध्ये त्यांचा सुरक्षारक्षक सोमनाथ पालवे याला देखील आपले एक बोट गमवावे लागलेले आहे.

दुसरीकडे याच कासारवडवली भागातील स्थानिक रहिवाशांनी दुकानदारांनी आणि स्थानिकांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कासारवडवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार पत्रे दिली आहेत. या भागातील फेरीवाले हे मजूर असून दादागिरी करतात, त्यांची गुंडगिरी चालते. यामुळे जर या फेरीवाल्यांना तात्काळ हटवले नाहीतर विपरीत परिणाम घडू शकतो,असं  पत्र कासारवडवलीतील रहिवाशांनी या तिघांना लिहिले होते.

तरुणानं स्वत:वर गोळी झाडून गमावला जीव, ऑनलाइन गेम खेळण्याची जडली होती सवय

तरीदेखील या कारवाईकडे दुर्लक्ष केले, यामुळेच कल्पिता पिंपळे यांच्यासोबत ही घटना घडली आहे, असं बोललं जात आहे आणि आता दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील एक क्लार्क याचा वाढदिवस त्याच्याच शासकीय कार्यालयामध्ये येऊन फेरीवाले साजरे करतात. हा फोटो व्हायरल झाल्याने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी फेरीवाले यांचे साटंलोटं किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

First published: