मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Online Gaming Addiction : तरुणानं स्वत:वर गोळी झाडून गमावला जीव, ऑनलाइन गेम खेळण्याची जडली होती सवय

Online Gaming Addiction : तरुणानं स्वत:वर गोळी झाडून गमावला जीव, ऑनलाइन गेम खेळण्याची जडली होती सवय

या तरुणाला मोबाईलवर गेम (Mobile Games) खेळण्याची खूप आवड होती. ऑनलाइन गेम खेळण्याची त्याची सवय हळूहळू व्यसनामध्ये बदलल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता.

  • Published by:  News18 Desk

चुरू, 03 सप्टेंबर : एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची (young man shot himself and committed suicide) धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला मोबाईलवर गेम (Mobile Games) खेळण्याची खूप आवड होती. ऑनलाइन गेम खेळण्याची त्याची सवय हळूहळू व्यसनामध्ये बदलल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मानसिक तणावामुळं त्यानं शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडली.

27 वर्षीय गिरीश हा ड्रायव्हिंग स्कूल चालवायचा, त्याला मोबाईलवर गेम खेळण्याची खूप आवड होती. गोळ्यांचा आवाज ऐकल्यावर गिरीशच्या घरात भीतीचे वातावरण होते. कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाचा कृत्य पाहून कुटुंब हादरलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. हा प्रकार राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडला आहे.

देशी बनावटीच्या पिस्तुलातून निघालेली गोळी मृताच्या डोक्याच्या मध्यभागी लागली. मृत तरुणाला मोबाईलवर सतत गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तो मानसिक तणावाखाली जगत होता. कोतवाली पोलिसांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिसांकडून कसून चौकशी

पोलीस या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. मृताचे वडील ताराचंद बुडानिया यांनी पोलिसांना सांगितले की, गिरीश कुमार मोबाईलवर गेम खेळत असत, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्याच्या चिडखोर स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांनाही त्रास होत होता.

हे वाचा - स्वत:च्या लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडला आणि पोलिसांनी हेरलं; दंगल भडकावण्याच्या प्रकरणात तरुण तुरुंगात

हा तरुण शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हाऊसिंग बोर्ड चुरूमध्ये असलेल्या त्याच्या घराच्या वरील खोलीत एकटा होता. या दरम्यान त्याने स्वतःवर गोळी झाडली. गोळ्यांचा आवाज ऐकून त्याची पत्नी वरच्या मजल्यावर गेली. त्याला रक्तस्त्रावात पडलेले पाहून पत्नीने शेजाऱ्यांना बोलावलं त्यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके चालू होते. त्यानंतर त्याला भरतिया हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणण्यात आलं, जेथे डॉक्टरांनी गिरीशला मृत घोषित केलं. घटनेनंतर  पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Games, Online