जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले आम्हाला विश्वास.., विरोधकांनाही लगावला टोला

सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले आम्हाला विश्वास.., विरोधकांनाही लगावला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज देखील सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17  जानेवारी :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणात नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी सात सदस्यांचं घटनापीठ स्थापन करायचं की नाही याचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. आज सुनावणीला सुरुवात होताच सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. संबंधित खटल्यावर नबाम रेबिया निकालाचा प्रभाव आहे की नाही हे तपासावं लागेल असं न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलताना म्हटलं आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी प्रतिक्रिया देतानाच विरोधकांना देखील टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं मुख्यमंत्र्यांनी? सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, आमचा मेरिटवर विश्वास आहे. लोकशाहीमध्ये बहुमताचं महत्त्व असतं. बहुमतावरच सरकार चालते. आम्ही सत्तेत देखील बहुमताच्याच आधारे आलो आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, न्यायव्यवस्था मेरिटच्या आधारावर निर्णय देईल. विरोधक वेळकाढूपणा करत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. हेही वाचा :  आता वरळीत भाजपचं शक्तिप्रदर्शन; ‘पाहुण्यांनाही घेऊन या’, शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं! अरविंद सावंतांचा टोला   दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणतात विरोधक वेळकाढूपणा करत आहेत, मात्र ज्यांना कायद्याचं ज्ञान असतं तेच असं बोलत असतील असा चिमटा सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना घेतला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, निकालाची उत्सुकता आम्हाला जास्त आहे, हा लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा निर्णय आहे, सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोग निर्णय घेईल असं वाटत नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात