जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde-Devendra Fadnavis PC) दिल्ली दौऱ्यावर आहेत. अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी दोन्ही नेत्यांनी घेतल्या. त्यानंतर त्यांनी आज राज्यातील जनतेशी दिल्लीतून संवाद साधला. दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion)  चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे. उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. शिंदे-फडणवीस अमित शाहंच्या भेटीला, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब! राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकीय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत. लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची देखील आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन आम्ही समजून घेणार आहोत. केंद्राची मदत मिळाल्यास राज्य वेगाने प्रगती करतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ‘ही गद्दारी नाही तर क्रांती; आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं…’; बंडखोरीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान महाराष्ट्रातील घडामोडींची देशाने नव्हे तर जगाने दखल घेतली. बहुमताचे स्थिर सरकार राज्याला मिळाले आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे, ती आम्ही स्थापन केली आहे. आम्ही आमचं काम करत राहू, कुणी काही बोललं तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात