ठाणे, 09 फेब्रुवारी : राज्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही नेत्याने जे करून नाही दाखवलं ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह आहे. ठिकठिकाणी केक कापले जात आहे. पण, शिंदेंनी सामाजिक भान जपत सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वाढदिवशी समाज उपयोगी काम करा, असा सल्लावजा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने राज्यभर त्यांचे समर्थक शिवसैनिक मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करत आहेत. ठाण्यात रात्री 12 च्या सुमारास कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवास्थानी समर्थकांनी हार, पुष्प आणि केक घेऊन एकच गर्दी केली होती. समर्थकांनी आपल्या लाडक्या सीएमला अक्षरश: वेढा घातला होता. 'एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत समर्थकांनी परिसर दणाणून सोडला.
(काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला, हल्लेखोर मागून आला अन्...)
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसैनिकांना कोणताही जल्लोष न करता समाजपयोगी कामे करण्याचे आवाहान केलं आहे. त्यामुळे राज्यभरात आज प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वरिष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे, अंध आणि अपंग व्यक्तींना त्यांच्या गरजे नुसार मदत करणे तसंच समाजातील दूर्बल घटकांना मदत करणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
('...हे खपवून घेतलं जाणार नाही', नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना इशारा)
स्व:ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबीयांसह ठाणे येथील निवासस्थानी साधेपणानं वाढदिवस साजरा करणार आहेत. मात्र त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली आहे. राज्यातील सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी आज दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणार आहेत. तसंच बाळासाहेबांची शिवेसना पक्षाचे नेते आणि मंत्री यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची विशेष तयारी केल्याची माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde