हिंगोली, 8 फेब्रुवारी : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: सोशल मीडियावरून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावात दौऱ्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. ही माहिती ही प्रज्ञा सातव यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट टाकून दिली आहे,त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.
माझे पती राजीव सातव नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाही वर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन, कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई फुले, इंदिराजी यासारख्या थोर महिलांवर ही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बघता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. असं प्रज्ञा सातव त्यात फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर लिहिले आहे.
Today I was brutally attacked at Kasbe Dhawanda Village Kalamnuri. An unknown person attacked me from behind .It was a serious attempt to injure me and there is a threat to my life . An attack on lady MLC is an attack on Democracy. Fight from front dont be a coward .
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) February 8, 2023
मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न झाला असून माझ्या जीवाला धोका आहे. महिला आमदारावरचा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोरून लढा मागून हल्ला करण्याचा भ्याडपणा करू नका, असं प्रज्ञा सातव त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.