जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, घडला मोठा अनर्थ

ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, घडला मोठा अनर्थ

अपघातात मृत झालेले दोन्ही भाऊ

अपघातात मृत झालेले दोन्ही भाऊ

छत्रपती संभाजीनगरच्या ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

  • -MIN READ Local18 Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल : हरणाला वाचवण्याच्या नादात पोलीस गाडीचा अपघात झाला. या भीषण अपघात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना याच जिल्ह्यातून समोर आले आहे. ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे संपूर्ण प्रकरण - भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या दुचाकीला चिरडले. या अपघात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. अपघाताची ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातील टिपु सुलतान चौकात घडली. रितेश ज्ञानेश्वर कळम आणि रुपेश ज्ञानेश्वर कळम अशी या दोन्ही मृत भावांची नावे आहेत. दोन्ही भाऊ सिल्लोड तालुक्यातील भवन येथील रहिवासी होती. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हरणाला वाचवण्याच्या नादात घडला भयंकर प्रकार - छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर पेट्रोलिंग दरम्यान हरण आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पेट्रोलिंग वाहन हे झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात विठ्ठल बदने हे पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. तर सिध्देश्वर विधाटे हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. भीषण अपघाताची ही घटना मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विशाल पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना उपचारासाठी शिऊर येथे दाखल करण्यात आले. जखमींवरती शिऊरच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. दरम्यान, पोलीस कर्मचारी विठ्ठल बदने यांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात