छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत, कधीही काही होऊ शकतं. अंबादास दानवे यांचा मला कॉल आला असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शिरसाट?
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा मला कॉल आला होता. केव्हाही काही होऊ शकतं असा दावा शिरसाट यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. आमच्या मागे गर्दी नाही तरी इथे इतके लोक कसे जमले. उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी यांचा निषेध केला नाही, अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा
एकीकडे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एकदा या सभेत उद्धव ठाकरे शिंदे गटाचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena