मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आमदारकी गेली उडत', सुषमा अंधारेंच्या तक्रारीनंतर संजय शिरसाट भडकले, म्हणाले...

'आमदारकी गेली उडत', सुषमा अंधारेंच्या तक्रारीनंतर संजय शिरसाट भडकले, म्हणाले...

महिला आयोगात त्यांनी जायलाच हवं मी नोटीस आली की नक्की उत्तर देईन

महिला आयोगात त्यांनी जायलाच हवं मी नोटीस आली की नक्की उत्तर देईन

संजय शिरसाट कधीही शब्दावर फिरवत नाही. मी माझा वक्तव्यावर ठाम आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छ.संभाजीनगर, 28 मार्च : ' तो संज्या तुझं वय काय माझं काय वडिलांना काय हाक मारता. आम्हाला वरातीचे घोडे बोलतात, मी जर बोललो की, महिलांचा अपमान केला आणि तुम्ही सगळ्याची उधळत बसायची हे चालणार नाही. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझा बद्दल मी काहीही खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर देणार गेली उडत ती आमदारकी, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट कमालीचे भडकले.

सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केल्यामुळे संजय शिरसाट यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्या तक्रारीनंतर संजय शिरसाट कमालीचे संतापले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंनाच इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात माझाकडे शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता त्यात माझं ते वक्तव्य होतं. या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहे. माझा भाऊ माझा भाऊ बोलत आमच्यावर जी टीका करत आहेत त्या माफ करायच्या का? जो व्हिडिओ माझा फिरतोय त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन, असं आव्हानच शिरसाट यांनी दिलं.

आमच्या नेत्याच्या मतदारसंघात जाऊन ते शिव्या देत आहेत. महिला म्हणून ते आरोप करतात. या पूर्व ते हिंदु देवी देवता, बाळासाहेब, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबाबत ते काय बोलल्या आहेत. मी त्यांची पत्रकार परिषद पाहून आलो ते काय बोलल्या. एखाद्याच्या मनात एक संतापाची भावना असते. त्या चांगल्या एक्टर आहेत. सुषमा अंधारे याच्यावर टीका केली तर तो संस्कारी नाही ही काय पद्धत आहे, असं शिरसाट म्हणाले.

(पवारांनी खडसावलं, ठाकरेंनी सुनावलं, सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधी बॅकफूटवर!)

एक चांगलं केलं त्यांनी त्या पत्रकार परिषदेत करोडपती केलं. ७२ कोटी माझाकडे असल्याचा आरोप केला. ते आरोप करतात पण अंगलट आलं की रडतात, लोकं अज्ञान नाहीत. शब्द बदलणं हा त्यांचा व्यवसाय झाला. त्यांची एक्टिंग ते मान हलवणे हे पाठ झालंय. माझा विरोधात आंदोलनं केली राजकारणात समोरासमोर लढलं पाहिजे, तुमच्याकडे जे व्हिडिओ आलेत त्यातील दोन महिलांना विचारा जे करत आहेत ते योगय करत आहेत. संजय शिरसाटला अॅटक आला मंत्रिपद न मिळाल्याने आला ते काय म्हणतात. कुणा कुणा बद्दल ते काय नको ते बोललेत, लोकं आंधळे नाहीत उघड्या डोळयाने ते पाहतील. जे बोलायचं ते बोला उघड पणे पक्षाचं नुकसान करा. तुम्हाला वाटतं मला जे बोलत आहे. माझामुळे पक्षाची उन्नती होतं आहे. वैयक्तीत बाबतीत मी जात नाही. परळीत कुणाची धिंड काढली होती. मला ही जास्त बोलायला लावू नका तुम्हाला जसं खोलात जाता येत मी तर थेट जातो तिथे, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

महिला आयोगात त्यांनी जायलाच हवं मी नोटीस आली की नक्की उत्तर देईन आणि चौकशीलाही जाईन. आज मातोश्रीवरून फोन गेला माझा विरोधात आंदोलन करण्यासाठी.. तेव्हा त्या महिला आंदोलनासाठी आल्या. ताई आमच्याबद्दल काहीही बोलू शकते. मुंबईत एवढे फ्लॅट आहेत त्यातला एक फ्लॅट घेतल्याचा बाऊ केला. या माझाकडे असत्य निघालं तर बघा मग. त्या ठोंबरे नावाच्या बाई मला बोलत आहेत. शितल म्हात्रेविषयी जेव्हा काल खालच्या भाषेत बोलण्यात आलं तेव्हा काय वाचा बसली होती का? असा सवालही शिरसाटांनी केला.

(शिंदे सरकारचा नवा निर्णय, रुग्णांवर उपचारासाठी घेणार मांत्रिकांची मदत, पैसेही देणार)

'कुणी जाईल तक्रार दाखल होईल असं नाही चालत चौकशीतर व्हायला पाहिजे. आपण सगळीकडून फसलोय हे त्यांना माहित आहे. टाळ्या वाजवाव्यात म्हणून ते काही बोलतात. मला ते बोलतात तेव्हा आमच्या घरातल्यांना काय वाटत असेल. ते संस्कार आम्हाला शिकवणार क्लास काढा आम्ही येतो शिकायला. कुणी तरी पोपट पंची हवा ते या आहेत, अशी टीकाही शिरसाटांनी केली.

संजय शिरसाट कधीही शब्दावर फिरवत नाही. मी माझा वक्तव्यावर ठाम आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही. माझी व्हिडीओ क्लिप खैरेंकडे असेल तर बाहेर काढा, लॉकरमध्ये का ठेवली आहे. खोटं तरी किती बोलायंचं लाज बाळगा. चंद्रकाच खैरे देव माणूस आहेत त्यांना स्वप्नात आलं असावं. तानाजी सावंत यांच्या बैठकीबाबत मला माहित नाही. संजय राऊत यांच्या टीकांना मी महत्व देत नाही. राऊत जे स्टोरी सांगत होते. नैतिक अधिकार तरी आहे का ? काही दिवसांनी ते उद्धव ठाकरे आणि पवार यांची स्टोरी सांगतील, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

First published:
top videos