संजय शेंडे, प्रतिनिधी
मेळघाट (अमरावती), 28 मार्च : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मांत्रिक म्हणजे भूमकाकडे जाऊन मेळघाटातील आदिवासी बांधव आपला आणि लहान बालकांचा अनेकदा उपचार करीत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहे. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाला.
लहान मुलांपासून मोठी मंडळीदेखील आजारपणात रुग्णालयात जाण्याऐवजी मांत्रिकाकडे धाव घेतात. परिणामी आजार कमी होण्यापेक्षा बळावतो. त्यामुळे वाढणारी अंधश्रद्धा पाहता मेळघाटात जिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांनी अनोखा उपक्रम समोर आला आहे.
आदिवासी बांधवांचा मांत्रिकावर जास्त विश्वास आहे. मात्र, आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा, यासाठी आता मांत्रिकच (भूमका) प्रशासनाला मदत करणार आहे. त्यासाठी प्रशासन मांत्रिकाच्या दारी पोहोचलं आहे.
मांत्रिकांनी रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि यासाठी प्रति रुग्ण 100 रुपये मानधन मिळावे, अशी ऑफर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी धारणी, चिखलदरा तालुक्यात दोन दिवसाचे प्रशिक्षण होणार आहे. मेळघाटात दोन तालुके आहेत. त्यात 300 ते 315 गावे असून त्यांची अडीच ते पावणे तीन लाख लोकसंख्या आहेत.
त्यात मेळघाटात कुपोषण, माता बाल मृत्यूचा प्रश्न कायम असल्याने 8 वर्षापूर्वी प्रशासनाने भूमकांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात येण्याचे आवाहन केले होते. मात्र, आर्थिक मोबदला नसल्याने भूमकाचा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे पुन्हा डॉक्टरांचे आणि भूमकाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहेत आणि रुग्ण कल्याण समितीकडून भूमकांना मानधन दिले जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.