जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घडवून आणलेलं..' इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

'शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घडवून आणलेलं..' इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

शरद पवार यांच्या राजीनाम्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 4 मे : ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्याही यावर प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी याला राजीनामा नाट्य म्हटलं आहे. पवारांचा राजीनामा म्हणजे घडवून आणलेलं नाट्य : इम्तियाज जलील शरद पवार यांचा राजीनामा फुल घडवून आणलेले नाट्य होतं, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. शरद पवार स्वतः प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत हे सांगून सर्वांना राज्यभरातून बोलावण्यात आलं होतं. सर्वांसमोर हे नाट्य घडवण्यात आलं. त्या दिवशी सुप्रिया ताई आणि अजित पवार यांची देहबोली अभ्यास करण्यासारखी होती. भविष्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडेल, अशी भविष्यवाणी देखील एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. वाचा - ‘तुम्ही तुमचं दुकान..’ राष्ट्रवादीच्या आमदाराचा पटोले, राऊतांना इशारा; म्हणाले.. पवारांचा कार्यकर्त्यांना संकेत शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्हीच अध्यक्षपदी राहावे, बाकी तुमचे सर्व निर्णय मान्य असल्याची भूमिका मांडली. यावर पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी घेतलेला निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधीच ‘हो’ म्हटलं नसतं. मी तुम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे होते ते मी केले नाही ही माझी चूक होती, अशी कबुली पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर दिली. सर्वांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सांगत शरद पवारांनी संकेत दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात