मुंबई, 02 एप्रिल : राज्यात मागच्या चार दिवसांपासून कोरडे वातावरण दिसत आहे. यामुळे राज्यातील तापमानात कमालीची वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी राज्यात पावसाचीस स्थिती असल्याने वातावरणात कमालीचा बदल होत होता. दरम्यान पुढचे काही दिवस तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एप्रिलचे पहिले दोन आठवड्यात तापमान वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी पडत असल्याचे चित्र होते. दरम्यान मागच्या दोन दिवसांत पारा 38 अंशांपर्यंत आला आहे. आजपासून (ता.02) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगात वाढ, WHO चा भारताबाबत मोठा इशारा
ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात चाळीशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान 31 ते 37 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानात काहीशी घट झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा 12 ते 24 अंशांच्या दरम्यान होता.
मध्य उत्तर प्रदेशपासून तेलंगाना पर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. ओडिशापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
तसेच पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशात कोरोनाची चौथी लाट? सातत्याने वाढतेय रुग्णसंख्या, काय म्हणाले तज्ज्ञ?
दरम्यान मागच्या 24 तासांत राज्यातील विविध ठिकाणी असा होता हवामान अंदाज, पुणे 32.8 (15.5), जळगाव 34.6 (18.2), धुळे 34.0 (13.4), कोल्हापूर 33.2 (19.7), महाबळेश्वर 28.5 (14.0), नाशिक 30.1 (15.4), निफाड 35.5(12.1), सांगली 34.3 (20.1), सातारा 34.7 (18.4), सोलापूर 37.3(22.1), सांताक्रूझ 31.8 (22.0), डहाणू 31.4 (21.0), रत्नागिरी 31.6 (22.1), छत्रपती संभाजीनगर 32.6 (16.1), नांदेड 36.4 (22.0), परभणी 36.1 (21.1), अकोला 35.0 (21.0), अमरावती 34.4(19.8), बुलढाणा 31.8 (18.8), ब्रह्मपूरी 38.0 (22.4), चंद्रपूर 38.0 (23.6), गडचिरोली 35.4(20.0), गोंदिया 34.2 (20.5), नागपूर 35.5 (20.6), वर्धा 36.6(22.4), वाशीम 35.2 (19.6), यवतमाळ 35.5 (20.5). तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Weather Update, Weather Warnings