मुंबई 02 एप्रिल : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. चार महिन्यांनंतर, शनिवारी देशात कोविड-19 ची 2,994 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली, तर सक्रिय रुग्णांची संख्या 16,354 झाली. त्यामुळे आता लोकांना कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाटत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संसर्गाच्या नवीन प्रकरणांसह भारतात कोविड -19 प्रकरणांची संख्या 4.47 कोटी झाली आहे. दरम्यान, 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 5,30,876 झाली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगात वाढ, WHO चा भारताबाबत मोठा इशारा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. गुजरातमध्ये एक आणि केरळमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची 16,354 सक्रिय प्रकरणे आहेत, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.04 टक्के आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.77 टक्के आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, रोजचा पॉझिटिव्हिटी रेट2.09 टक्के आणि आठवड्याचा 2.03 टक्के नोंदवला गेला.
असं मानले जात आहे, की 100 पेक्षा कमी प्रकरणांच्या खालच्या बेसपासून 30 पट वाढ होण्याची शक्यता असतानाही, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. कोविड डेटा विश्लेषक विजयानंद यांच्या मते, ओमिक्रॉन XBB 1.16 प्रकार देशभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागचं कारण असू शकतो.
शनिवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 416 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर संसर्ग दर 14.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली असून मृतांची संख्या २६,५२९ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.