नवी दिल्ली, 1 एप्रिल : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3000 हून अधिक झाली आहे. मागील 9 दिवसात ही रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये 40 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, देशातील अनेक राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी रणनीतीवर काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या आहेत. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, 27 फेब्रुवारी ते 26 मार्चपर्यंत दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ -
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सोलापूरमध्ये मार्चमध्ये 20.05 टक्के पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर सांगलीमध्ये 17.47 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी सर्वात जास्त आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये दररोज सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जमणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्याचवेळी राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यानंतर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने काही दिवस यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या होत्या. दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मुलींच्या आवाजात नोकरीसाठी फोन येतोय, सावधान! दोघांनी मिळून बेरोजगारांना लावला लाखोंना चुना
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, चाचणीमध्ये कोविड-पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जात आहे, जेणेकरून कोणताही नवीन प्रकार ओळखता येईल. ते म्हणाले की, दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी असेही सांगितले की, सध्या मास्कबाबत केंद्राकडून कोणतीही नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली नाही. काही मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona updates, Corona virus in india, World After Corona