छत्रपती संभाजीनगर, 20 मे, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुलीच्या वडिलांनी लोखंडी दांड्यानं जबर मारहाण केली, या घटनेत आरोपीचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून, त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दळण दळण्यासाठी जात असलेल्या एका 17 वर्षीय मुलीचे ओढणीने तोंड दाबून तिला पत्र्याच्या शेडमध्ये नेत तिच्यावर तीस वर्षीय आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरडाओरड केल्यानं घटनास्थळापासून जवळच असलेल्या आई-वडिलांनी घटनास्थळाकडे धाव घेत आपल्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.
तरुणाचा खून, दोन दिवस होता बेपत्ता; गर्लफ्रेंडला केलेल्या कॉलवरून लागला छडा
मात्र आपल्या मुलीची अवस्था बघून पित्याचा संताप अनावर झाला आणि त्याने लोखंडी दांड्यानं आरोपीला मारहाण केली. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावणी आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.