सारण, 20 मे : सारण जिल्ह्यातल्या मढौरा इथं एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो छपरा इथं एका खड्ड्यात फेकण्यात आला होता. या प्रकरणाचा खुलासा पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर झाला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह बिनटोलिया गावातील एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून ताब्यात घेतला. तरुणाचे नाव अमित पांडे असून तो सारण जिल्ह्यातल्या पुरनाडीह गावात राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमित पांडे हा १६ मे रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांना पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलीस तरुणाचा शोध घेत होते. त्याच्या कॉल डिटेल्सच्या मदतीने पोलिसांनी एका मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाचा खून केल्याचं कबूल केलं. रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवकाचा मृतदेह, घटनास्थळावरील स्थिती पाहून पोलीस हादरले तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह छपरा इथं एका खड्ड्यात टाकल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी यानंतर मृतदेह टाकलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. अमित पांडेचे गावातीलच तरुणीसोबत प्रेमप्रकरण होते. 16 मे रोजी तो जेवल्यानंतर झोपण्यासाठी छतावर गेला. पण त्यानंतर बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार सुरुवातीला पोलिसात दिली. पण दोन दिवसानंतरही काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांवर घातपाताचा संशय व्यक्त केला. एसपी गौरव मंगला यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. त्यांनी चौकशीत खून केल्याचं कबूल केलंय. आता अधिक चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.