मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जालन्यातील तृतीयपंथीयांचं तरुणासोबत भयंकर कांड; पुण्याला नेऊन बनवलं स्त्री

जालन्यातील तृतीयपंथीयांचं तरुणासोबत भयंकर कांड; पुण्याला नेऊन बनवलं स्त्री

तरुणावर जबरदस्तीनं लिंग बदलाची शस्त्रक्रिया

तरुणावर जबरदस्तीनं लिंग बदलाची शस्त्रक्रिया

जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका तरुणाचं जबरदस्तीनं लिंग परिवर्तन करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India

जालना, 18, मार्च, रवी जैस्वाल :  जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  शहरातील एका तरुणाचं जबरदस्तीनं लिंग परिवर्तन करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला पुण्यात नेऊन त्याच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे या तरुणाला स्त्री बनवण्यात आलं.

पुण्याला नेऊन लिंग परिवर्तन

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात एका तरुणाचं जबरदस्तीनं लिंग परिवर्तन करण्यात आलं आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कन्हैयानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाची  तृतीय पंथीयांसोबत ओळख झाली होती. या तृतीयपंथीयांनी त्याला पुण्याला नेऊन जबरदस्तीनं त्याचं लिंग परिवर्तन केलं. लिंग परिवर्तन करून या तरुणाला स्त्री बनवण्यात आलं आहे.

संगमनेरमध्ये भीषण अपघात; टँकर-दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 1 जखमी

खंडणीची मागणी 

त्याचबरोबर त्याला रस्त्यावर भीक मागण्यास भाग पाडलं. हा  लिंग परिवर्तन झालेला तरुण कुटुंबियांसोबत राहत असल्यानं त्याच्याकडे प्रति महिना दहा हजार रुपये खंडणी देखील मागण्यात आली. त्याने खंडणी देण्यास नकार दिल्यानं त्याला काही तृतीयपंथीयांनी रुग्णालयात जाऊन पुन्हा मारहाण केली. दरम्यान पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून संबंधित सात तृतीयपंथीयांविरोधात जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Jalna