मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मध्यरात्री पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य; दोन मुलं लपून बसल्याने वाचला जीव

मध्यरात्री पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य; दोन मुलं लपून बसल्याने वाचला जीव

पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य

पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य

Crime News: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सकाळी ही घटना गावातील लोकांना समजली.

  • Local18
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

अजय कुमार पटवा, प्रतिनिधी

उज्जैन, 29 मार्च : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलीची चाकूने वार करून हत्या केली. रात्री गाढ झोपेत असताना आरोपीने त्यांच्यावर वार केले. यावेळी इतर दोन मुलं शेजारच्या खोलीत लपल्याने त्यांचा जीव वाचला आहे. ही घटना जिल्ह्यातील नरवार पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. यामुळे ताजपूरजवळील टंकारिया गावात एकच खळबळ उडाली आहे.

ओंकार नरवरिया असे 40 वर्षीय आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत 35 वर्षीय पत्नी ताराबाई आणि 13 वर्षीय मुलगी रवीना यांचा मृत्यू झाला आहे. तर हत्येवेळी ओंकारची दोन्ही मुले, 15 वर्षांचा अंकित आणि 10 वर्षांचा मोहित हे शेजारीच झोपले होते.

वडीलही दोघांना मारण्यासाठी धावले पण दोन्ही मुलांनी घरातील एका खोलीत लपून आपला जीव वाचवला. आरोपीची दोन्ही मुले मोहित आणि अंकित यांनी सांगितले की, रात्री 12 वाजता आई व बहिणीच्या किंचाळण्याच्या आवाजाने आम्हाला जाग आली. तेव्हा वडील आई व बहिणीला मारहाण करत होते. त्याने दोघांवर चाकूने हल्ला केला. आम्ही घाबरलो आणि समोरच्या खोलीत लपलो. खोलीचा दरवाजा आतून बंद केला. दोन्ही मुलं रात्रभर दिवस होण्याची वाट पाहत होते.

वाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अशीही भारी आयडिया; युट्यूबवालेच देतात पैसे

सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांचे काका आल्यानंतर खोली उघडली, त्यानंतर दोन्ही मुलांनी रात्रीची संपूर्ण घटना काका आणि गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी गावचे सरपंच आणि पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर पोलिस आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उज्जैनला पाठवले. या घटनेनंतर मृताचा पती ओंकार याने स्वतःलाही जखमी करुन घेतलं होते. पोलिसांनी ओंकारला उपचारासाठी उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात नेले. आरोपी ओंकारच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार हा मानसिकदृष्ट्या खचला असून त्याच्यावर गेल्या दोन वर्षांपासून उपचार सुरू आहेत. मयत पत्नीचे नाव ताराबाई (वय 35 वर्षे) तर मृत मुलीचे नाव रवीना (वय 12 वर्षे) असून ती आठवीत शिकत होती. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Madhya pradesh