जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story: 2 वेळेस PSI पद हुकलं, नाश्ता सेंटरमधून करतो लाखोंची कमाई, Video

Success Story: 2 वेळेस PSI पद हुकलं, नाश्ता सेंटरमधून करतो लाखोंची कमाई, Video

Success Story: 2 वेळेस PSI पद हुकलं, नाश्ता सेंटरमधून करतो लाखोंची कमाई, Video

छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाला दोनदा PSI पदानं हुलकावणी दिली. सचिन जाधव नाश्ता सेंटर सुरू करून लाखोंची कमाई करत आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च : MPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम आवश्यक असतो. पण तरीही अपयश आलं तर अनेकजण खचून जातात. पण छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दोनदा PSI परीक्षेत उत्तीर्ण होऊनही उंची कमी असल्याने निराशाच पदरी पडली. घरची परिस्थिती हालाखिची असल्याने खचून न जाता त्याने नाश्ता सेंटर सुरू केले. आता सचिन आण्णासाहेब जाधव हा तरुण लाखोंची कमाई करत आहे. घरची हालाखिची परिस्थिती सचिन अण्णासाहेब जाधव हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली गावचा आहे. आई-वडिल मोलमजुरी करून घर चालवत होते. तर सचिनचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीत असातनाच आईचं निधन झालं. घरची परिस्थिती हालाखिची होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करून साहेब होण्याचं स्वप्न तो पाहू लागला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    छत्रपती संभाजीनगर गाठलं घरची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारी नोकरी मिळवायची या निश्चयानं सचिननं छत्रपती संभाजीनगर गाठलं. राज्यशास्त्रातून पदव्युत्तर पदवी मिळवली. 2016 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लास, लायब्ररी लावण्यासाठी जवळ पैसने नव्हते. त्यामुळे सचिनने रात्रपाळीत सुरक्षारक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. रात्री सुरक्षारक्षकाची नोकरी करून सचिन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. जिद्दीनं यश मिळवूनही पदरी निराशा स्पर्धा परीक्षेसाठी सचिननं जीव ओतून अभ्यास केला. 2016 ते 2021 दरम्यान दोन PSI परीक्षेत यश मिळालं. परंतु, उंची कमी असल्याने घात झाला आणि आलेली संधी गेली. याच काळात कर सहाय्यक, लिपीक अशा परीक्षांतही यशानं अंतिम क्षणी हुलकावणी दिली. त्यानंतर कोरोनाचा संकटकाळ सुरू झाला. MPSC च्या जाहिराती आल्या नाहीत. त्यातच घरची परिस्थिती खूपच हालाखिची बनली होती. त्यामुळे जबाबदारी वाढली आणि कामधंदा करणं गरजेचं बनलं. वय वर्ष 3, रात्री झोपेत असतानाच बापाने केला अ‍ॅसिड हल्ला, पण तिच्या जिद्दीला खरंच सलाम! प्रेरणादायी कहाणी वाचाच… चहा-नाष्ट्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घरच्या परिस्थितीमुळे सचिनला कामधंदा शोधणं गरजेचं झालं होतं. तेव्हा त्यानं छत्रपती संभाजीनगरात चहा-नाष्ट्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण भांडवलाची समस्या होती. तेव्हा सचिनला मित्रांनी मदत केली. भांडवल जमा झालं आणि सचिननं छत्रपती संभाजीनगर शहरातील नारळीभाग भागाच्या चौकामध्ये व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याला जवळपास एक लाख रुपये खर्च आला. MPSC परीक्षेसाठीची त्रिसूत्री कामी आली सचिनने व्यवसाय सुरू केला मात्र पहिल्या दिवशी केवळ 70 रुपये धंदा झाला. यावेळी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाणारी त्रिसूत्री कामी आली. सचिनने जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवून व्यवसायात टिकून राहण्याचा निर्णय घेतला. पुढे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. करायचं ठरलं तर काही करू शकतो, CD डिलक्स पाणीपुरीवाला सोशल मीडियावर व्हायरल नोकरी शोधणारा बनला रोजगार देणारा सचिनच्या चहा नाश्ता सेंटरवर सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री पर्यंत या ठिकाणी ग्राहक येत असतात. त्यामुळे कामगारांची गरज निर्माण झाली. नोकरी शोधणाऱ्या सचिनने आता सहा जणांना रोजगार दिला आहे. तर चहा नाष्ट्यातून महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न मिळू लागले. तो चहा, पोहे, शिरा, उपमा, खिचडी यासारखे पदार्थ बनवतो. यातून दिवसाला 15 हजारांचा धंदा होतो. भविष्यात हा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये वाढवायचा असून त्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे सचिन जाधव सांगतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात