जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देशभरातील 35 महान स्त्रियांवर मिळणार एका क्लिकवर माहिती, 'या' विद्यापीठाची मोठी भेट, Video

देशभरातील 35 महान स्त्रियांवर मिळणार एका क्लिकवर माहिती, 'या' विद्यापीठाची मोठी भेट, Video

देशभरातील 35 महान स्त्रियांवर मिळणार एका क्लिकवर माहिती, 'या' विद्यापीठाची मोठी भेट, Video

या ग्रंथालयाने देशातील 35 महान स्त्रियांवरील ई-रिसोर्सेस एका क्लिकवर उपलब्ध करून दिले आहेत.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत,प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्र (केआरसी) अर्थात मध्यवर्ती ग्रंथालयाने देशातील 35 महान स्त्रियांवरील ई-रिसोर्सेस एका क्लिकवर उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक पीएचडी प्रबंध संत मीराबाई यांच्यावर 14 आहेत. झुंपा लहरी यांच्यावरती 12 तर अमृत प्रीतम यांच्या वरती 11 व यासोबतच देशातील 32 महान महिलांवरती पीएचडी प्रबंध उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक आणि पत्रकारांना विद्यापीठ संकेतस्थळावरून हे साहित्य डाऊनलोड करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कीआरसीमध्ये 3 लाख 90 हजारएवढी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. 15 हजारहून अधिक ई जर्नल आणि 30 लाख ई-बुक्स उपलब्ध आहेत. यामध्ये निवडक ग्रंथ, निवडक पीएचडी प्रबंध, व्हिडिओ डॉक्युमेंटरी, सिनेमे प्रबंध आणि इतर ई-रिसोर्सेसचे संकलन करण्यात आले आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    भारतातील प्रभावी ठरलेल्या 35 महिलांचे ई-रिसोर्सेस एकत्रित करून आता एका क्लिकवर हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. 35 महिलांवर 723 ई-रिसोर्सेस संकलित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 76 निवडक ग्रंथ आहेत तर 112 पीएचडी प्रबंध ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये व्हिडिओ, सिनेमा, डॉक्युमेंटरीची संख्या 272 आहे. तसेच शोधनिबंधांच्या इतर साहित्य 257 रिसोर्सेस उपलब्ध आहे. एमफिलच्या प्रबंधांची संख्या ही 6 पर्यंत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ऑनलाईन पीएचडी संत मीराबाई यांच्यावर आहेत. तसेच देशातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरती 8 पीएचडी प्रबंध आहेत. सरोजिनी नायडू यांच्यावरती 4, तर राजमाता जिजाऊंवर 1, सावित्रीबाई फुलेवर 4, अमृत प्रीतम यांच्यावरती 11 पीएचडी प्रबंध आहेत. तसेच झुंपा लहिरी यांच्यावर 12 पीएचडी प्रबंध आहेत. महाश्वेता देवी 7, गौरी देशपांडे 4, कवयित्री इंदिरा संत यांच्यावरती 3 पीएचडी आहेत.

    Ahmednagar News: मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून शाळेनं राबवला भन्नाट उपक्रम, पाहा Video

    अमृत प्रीतम यांच्यावर ग्रंथ सर्वाधिक साहित्यिक अमृत प्रीतम यांच्यावरील निवडक ग्रंथ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर 18 तर महाश्वेता देवी यांच्यावर 13 ग्रंथ आहेत. लीला मुजुमदार यांच्यावर 5, इंदिरा गांधी यांच्यावर 6, मदर तेरेसा यांच्यावरती 5, संत मीराबाई, आहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील प्रत्येकी 3 ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच संत इंदिरा आणि दुर्गा भागवत यांच्यावरती प्रत्येकी 2 ग्रंथ उपलब्ध आहेत.

    सहावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video

    माहिती ऑनलाईन उपलब्ध ऑनलाईन साहित्य आणि पीएचडी प्रबंध, सिनेमा शोधनिबंध एकत्रित करून घेण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू आहे. ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे संशोधन करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना व या महान स्त्रियांबद्दल माहिती जाणून घेणाऱ्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना या देशातील महान स्त्रियांवरील माहिती हवी असेल त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाऊन मिळवता येईल, असं केआरसीचे संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात