सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च : मानवाने स्वतःच्या सुख सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. याचे परिणाम निसर्गाच्या ऋतुचक्रात झालेल्या बदलातून दिसून येत आहेत. ही एक गंभीर बाब झाली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील अवनीश जाधव हा सहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी मीयावाकी झाडे लावण्याचा पद्धती वरती संशोधन करत आहे. या पद्धतीमुळे झाडांचे जंगल घनदाट होते तर कार्बन शोषून घेण्यास मदत होते.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागामध्ये राहणारा अवनीश विजय जाधव. अवनीशचे वडील डॉ.विजय आणि आई डॉ. प्रिती दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत. तो सध्या शहरातील स्टेपनिंग स्टोन शाळेमध्ये सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तो गावाकडे गेला असता, त्याला गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे दिसली. या झाडांवर चिमण्या देखील होत्या. या चिमण्या आणि हा परिसर बघून तो भारावून गेला. मात्र अशी परिस्थिती शहरातील घराकडे का नसते असा प्रश्न त्यानी पालकांना विचारला.
त्यावेळेस त्याच्या पालकांनी त्याला सांगितलं की, मानवाने स्वतःच्या सुख सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आणि यामुळे परिसरात झाडे आणि पक्षी आपल्याला बघायला मिळत नाही. याच दरम्यान अवानिशची होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी निवड झाली. यादरम्यान प्रकल्पासाठी पर्यावरणाचा विषय निवडावा का? असा प्रश्न त्याने त्याच्या शिक्षिका श्रुती बाहेती यांना विचारला. यावेळेस त्यांनी मीयावाकी झाडे लावण्याचा पद्धती वरती संशोधन करण्याचा सल्ला दिला.
मीयावाकी पद्धतीसाठी अवनीशने संशोधन सुरू केल्यानंतर शहरात लावण्यात आलेल्या झाडांची माहिती घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने झाडे लावली आहेत याची त्यांनी सर्वत्र माहिती गोळा केली. त्यानंतर तो वाळूज येथील टूल टेक टऊलिंगस, वन विभाग आणि काम इको पार्क येथील मीयावाकी फॉरेस्टचा अभ्यास करत आहे. आतापर्यंत त्यांनी सहा हजार चौरस फुटांवरील फॉरेस्टचा अभ्यास केला आहे. यासाठी अवनीश याला शाळेच्या प्राचार्य डॉ.डीक्रूज, नितीन बाहेती, रश्मी बाहेती हे मार्गदर्शन करत आहेत.
Beed News: आठवीतला अभय करणार 'इस्रो'ची वारी, पाहा त्यानं कसं मिळवलं यश? Video
काय आहे मीयावाकी पद्धत
मियावाकी झाडे लावण्याची पद्धत ही जापानीज वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहे. या पद्धतीने नुसार लहान खड्ड्यांमध्ये दाटीवाटीने वेगवेगळी वृक्ष लागवड केली जाते. या झाडे लावण्याच्या पद्धतीमुळे वृक्ष दहा पटीने वाढतात आणि दोन ते तीन वर्षात परिसर मोठ्या जंगलात रूपांतरित होतो. हे जंगल 30 पट घनदाट असते व सुमारे 30 पट कार्बन शोषून घेतला जात असल्यामुळे ते जंगल पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक असते. या पद्धतीमध्ये केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपांची दाट लागवड केली जाते. रोपटी निवडतानाही दुर्मिळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते. या जंगलामध्ये एक महिना ते बारा महिने वयाची रोपे लावण्यात येतात. यातून विविध प्रजातींच्या वृक्षांचे घनदाट जंगल तयार केले जाते असं अवनीश याने सांगितलं.
Latur News: टाकाऊपासून टिकाऊ; चक्क प्लास्टिक बाटल्यांपासून बनवला बेंच! Video
झाडे लावण्यासाठी प्राधान्य द्यावं
याचं संशोधन मी बारकाईने करत आहे. यासाठी मी माझ्या शाळेच्या शिक्षकांची मदत घेत आहे. यासोबतच इंटरनेटवरूनही माहिती काढली आहे. भविष्यात मी या वृक्ष लागवड पद्धती वरती आणखी काम करणार आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागून वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येऊ शकते. ही परिस्थिती टाळायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावण्यासाठी प्राधान्य द्यावं, असंही अवनीश सांगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.