जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा सल्ला वाचा, तुमचाच होईल फायदा!

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा सल्ला वाचा, तुमचाच होईल फायदा!

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा सल्ला वाचा, तुमचाच होईल फायदा!

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. आगामी काही दिवसात त्यांनी पिकांची काळजी कशी घ्यावी याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, 5 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पिकांची कशी काळजी घ्यावी या संदर्भात शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे. याबाबत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि कृषी केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या विभागानं 5 ते 8 एप्रिल या कालावधीसाठी हा सल्ला दिला असून त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. काय आहे अंदाज? छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात  कमाल तापमान 34 ते 36 तर किमान तापमान 15 ते 18 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये सापेक्ष आद्रता ही 36 ते 75 टक्के तर वाऱ्याचा वेग 14 ते 17 किमी प्रती तास राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. पिकनिहाय सल्ला…. बटाटा:   काढणीस आलेले किंवा तयार असलेले बटाटा पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून आकारमानानुसार आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरावेत. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत. कलिंगडाला फक्त 80 पैसे प्रतिकिलोचा भाव, शेतकऱ्याने करावं तरी काय? मका : उन्हाळी मका काढणे अवस्थेत असल्यास अंतर मशागत आणि तण व्यवस्थापन करून घ्यावे.  त्याचबरोबर पेरणी करून एक महिना झाला असल्यास 75 किलो नत्र प्रती हेक्टर युरिया द्यावे. मोसंबी : मोसंबीसासाठी सांभाव्य तापमान वाढीचा विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. मोसंबी बागेत पाण्याचा ताण भासणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर बागेत गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष पालापाचोळा या आच्छादनांचा वापर करावा. मोसंबी बागेत कोळी किड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा इथीऑन 20 इसी 20 मिली. किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    News18लोकमत
    News18लोकमत

    डाळींब : डाळिंबांच्या बागेचे गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष पालापाचोळा या आच्छादनांचा वापर करावा. डाळिंब बागेमध्ये फळांचा आकारांमध्ये वाढ होण्याकरिता सूक्ष्म अन्नद्रव्याची 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला :  फुलधारणा ते फळधारणा अवस्थेत असल्यास यांच्यासाठी तापमानात होणाऱ्या संभाव्य वाढ लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी.  भाजीपाला पिकास सकाळी व संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे तसेच टोमॅटो पिकावर नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या  व्यवस्थापनासाठी फिप्रोनील पंधरा मिली किंवा सायंट्रा नीली रोल 10.26% ओडी पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो : या पिकावरील फळे पोखरणाऱ्या आळीच्या व्यवस्थापनासाठी किनवलं पंचवीस टक्के इसी 20 मिली किंवा क्लोराट्रीनिलीप्रॉल् 18.5 एसी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नैसर्गिक आपत्तीनंतर द्राक्षांचा गोडवा कायम, युरोपीयन देशांमधील निर्यातीत वाढ, Video पशूसंवर्धन : तकऱ्यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्याकरता त्यांना दिवसा झाडाखाली किंवा सावलीत बांधावे. गोठ्याच्या छताला पांढरा रंग देऊन त्यावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे. जनावरांना दुपारच्या वेळी करावयास नेऊ नये.  त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे. कोंबड्यांच्या शेडमध्ये तापमान नियंत्रण ठेवण्याकरता पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी.  पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी द्यावे तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्यांना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतच द्यावं, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात