जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Crime News : 3 मुलांची वडिलांना बेदम मारहाण, जीव जाईपर्यंत सोडलं नाही, बीडमधील संतापजनक घटना

Crime News : 3 मुलांची वडिलांना बेदम मारहाण, जीव जाईपर्यंत सोडलं नाही, बीडमधील संतापजनक घटना

3 मुलांनी घेतला वडिलांचा जीव

3 मुलांनी घेतला वडिलांचा जीव

रागाच्या भरात मुलांनी बापाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बापाचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, बीड 24 जुलै : वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात. मात्र कधीकधी मुलं हे सगळं विसरून बापाचाच छळ करतात. अशीच एक धक्कादायक घटना आता बीडमधील समोर आली आहे. यात तीन मुलांच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज शहरात उघडकीस आली आहे. मनोहर गायके (वय 45) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. रागाच्या भरात मुलांनी बापाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनोहर गायके गंभीर जखमी झाले. यानंतर जखमी बापाचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. केज शहरातील अहिल्यानगर परिसरात तीन मुले आणि पत्नीसह राहणारे मनोहर गायके (वय 45) खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. मुलांनी त्यांना बोअरच्या पाईपने मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. विकृतीचा कळस! तरुणीच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस खाल्ले, दोघांना अटक मारहाणीत बेशुद्ध झालेल्या वडिलांना उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. मुलांनीच बापाचा जीव घेतल्याची ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा मनोहर गायके, शंकर मनोहर गायके आणि ईश्वर मनोहर गायके अशी वडिलांना मारहाण करणाऱ्या तीन मुलांची नावं आहेत. तिन्ही आरोपींना पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केलं. या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात