मयूरभंज, 24 जुलै : ओडिशातील मयूरभंज इथं स्मशानात दोन व्यक्तींनी मानवी मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मयूरभंजच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे. बानसाही गावात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं जे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस खात होते. गावकऱ्यांना ही माहिती समजताच दोघांना पकडून पोलिसांकडे सोपवलं होतं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, बानसाही गावात राहणारी २५ वर्षीय मधुस्मिता आजारी पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र ती वाचू शकली नाही. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला आणि गावात अंत्यसंस्कार केले गेले. तेव्हा दोन्ही आरोपींनी तिच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस खाल्ले. Bharat Gaikwad : ACP ने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; मग स्वतःलाही संपवलं, घटनेनं पुणे हादरलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे सुंदर मोहन सिंह आणि नरेंद्र सिंह अशी आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील राधाकांत त्रिपाठी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मानवाधिकार आयोगाने 20 जुलै रोजी आदेश जारी केले आहेत. वकील त्रिपाठी यांनी म्हटलं की, मानवी मांस खाऊन दोघांनीही मृत्यूनंतर असलेल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. याचिकाकर्त्यांनी म्हटलं की, पावसामुळे मृतदेह पूर्ण जळाला नव्हता. दोन्ही आरोपी मृतदेहाचा एक तुकडा घेऊन आले होते आणि तो त्यांनी खाल्ला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. मयूरभंजमध्ये काळीजादू आणि स्मशान साधना सारख्या गोष्टी घडत असल्याचा दावा त्रिपाठी यांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.