मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण..'; मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा

'दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण..'; मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Panvel, India

मुंबई 23 जुलै : पनवेलमध्ये भाजप कार्यकारणीची बैठक सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. यावेळी राज्यातील सत्तातराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..' नितेश राणेंचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील म्हणाले, की अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले

पुढे ते म्हणाले, की सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. पुढे ते म्हणाले, की जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील ही 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश

यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. मुंबई महानगर पालिका आपण जिंकायची, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil