कोल्हापूर, 14 जून: सध्या देशात भाजपविरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे. याला शिवसेना आणि काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवला आहे. यावर मात्र आता भाजपकडून उत्तर आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर उत्तर दिलं आहे. काय म्हणाले चंद्रकांत पाटील मराठी अस्मिता आम्हालाही आहे. देश एक आहे त्यामुळे मराठी, हिंदी भाषिक उमेदवार असं म्हणून चालणार नाही. पण उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा हवा, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनी लगावला आहे. संजय राऊत काय म्हणाले भाजपनंच (BJP) शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते. भलतंच काहीतरी! ‘या’ व्यक्तीनं चक्क बिअर पिऊन वजन केलं कमी, पाहा फोटो शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिलं जातं, असं ही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नाना पटोले काय म्हणाले? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपतिपदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे आणि 21 जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येईल. राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाळ संपणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलैला संपत आहे. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाकडून सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. या निवडणुकीत केवळ विधानसभा आणि लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरवतं. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.