जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात', छगन भुजबळ भडकले

'किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात', छगन भुजबळ भडकले

'किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात', छगन भुजबळ भडकले

‘किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात,’ अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 13 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात,’ अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला राग व्यक्त केला आहे. ‘याआधी देखील मोदींची तुलना प्रभू रामचंद्राशी करण्यात आली होती. शिवाजी महाराज यांच्या नावावर मत मागायची आणि आता तुलना करायची. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले परत घेतले, मोदींनी pok घेतला का? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यावर प्रचंड प्रेम केले आणि आता शेतकरी मरत आहेत. या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे,’ अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनाही आक्रमक नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं पुस्तक प्रकाशनाच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला आहे. तसंच बॅनरवर असलेल्या भाजपच्या नेत्यावर शाई फेक करत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप-शिवसेनेच्या वादाबद्दल बोलताना अबू आझमींची जीभ घसरली, फडणवीसांना म्हणाले… वाद पेटला, अनेकांनी व्यक्त केली नाराजी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर याबाबत आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीची तुलना आपल्या कुणाशीही करता येणार नाही,’ अशा शब्दांमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच हे पुस्तक थांबवण्यात यावं, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. काय म्हणाले संभाजीराजे? ‘छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील,’ असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात