भाजप-शिवसेनेच्या वादाबद्दल बोलताना अबू आझमींची जीभ घसरली, फडणवीसांना म्हणाले...

भाजप-शिवसेनेच्या वादाबद्दल बोलताना अबू आझमींची जीभ घसरली, फडणवीसांना म्हणाले...

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

वर्धा, 13 जानेवारी : 'देवेंद्र फडणवीस यांच्यापासून वेगळे होत सरकार बनवणे हा उद्धव ठाकरे यांचा योग्य निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळेत फडणवीसांना लाथ मारली,' अशा तिखट शब्दांत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच अबू आझमींनी NRC आणि CAA च्या मुद्द्यावरून मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.

'NRC आणि CAA च्या विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने अबू आजमी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 1 लाख किलोमीटर यात्रा करून असहकार आंदोलन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वर्ध्यात आलेल्या अबू आजमी यांनी फडणवीसांवर टीका करत उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे. तसंच नागरिकत्व कायद्याचा विरोध केला आहे.

'PM मोदींनी चांगलं काम केलं की...'

'नरेंद्र मोदी यांनी एक काम चांगल केलं की झोपलेल्याना जाग केलं. आज ही लढाई देशातील सर्वच नागरिक लढत आहे. देशातील सर्व दलित, मुस्लीम बांधवांचे अभिनंदन. योग्य वेळेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांना लाथ मारली आणि महाराष्ट्रात नवीन महाविकास आघाडी स्थापन केली अन्यथा जे उत्तरप्रदेशात परिस्थिती आहे ती महाराष्ट्रात झाली असती, अशी खरमरती टीका टीका केली आहे.

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' वाद पेटला, काँग्रेस नेत्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

दरम्यान, देशभरत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून रान पेटलं असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. अबू आझमी हे 1 लाख किलोमीटरची यात्रा करत NRC आणि CAA विरोधात आंदोलन करत आहेत.

देशात CAA लागू, सरकारची अधिसूचना जारी

देशभरात आक्रमक आंदोलने झाल्यानंतरही नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेतही वादळी चर्चा झाली होती. 125 विरूद्ध 105 च्या फरकाने राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला आहे. CAA कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 08:01 AM IST

ताज्या बातम्या