Home /News /maharashtra /

केंद्र सरकारचं महाराष्ट्र पोलीस दलातील 14 अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठं गिफ्ट

केंद्र सरकारचं महाराष्ट्र पोलीस दलातील 14 अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठं गिफ्ट

केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिसातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीला अनोखी भेट दिली आहे.

नवी दिल्ली, 14 जानेवारी : केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्र पोलिसातील (Maharashtra Police) 14 पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीला (Makar Sankranti) अनोखी भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना IPS केडर जाहीर करण्यात आलं आहे. खरंतर 2019 पासून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची यादी प्रलंबित होती. अखेर केंद्र सरकारने 2019 आणि 2020 ची प्रलंबित यादी जाहीर केली आहे. ही यादी मकरसंक्रांतीच्या दिवशीच जाहीर झाल्याने राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडून मकरसंक्रांतीचं गिफ्ट देण्यात आल्याचं मानलं जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत 2019 च्या 8 तर 2020 च्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबतचे अधिकृत आदेश पारीत केले आहेत. विशेष म्हणजे 14 अधिकाऱ्यांपैकी डी एस स्वामी आणि एस पी निशाणदार हे मुंबईत डिसीपी होते. 'हे' आहेत 14 अधिकारी - 2019 सिलेक्शन एन ए अष्टेकर मोहन दहिकर विश्वा पानसरे वसंत जाधव श्रीमती स्मार्तन पाटील एस डी कोकाटे पी एम मोहीते संजय लाटकर 2020 सिलेक्शन सुनील भारद्वाज सुनील कडासने संजय बारकुंड डी एस स्वामी अमोल तांबे एस पी निशाणदार ('एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल', जयंत पाटलांनी उडवली खिल्ली) देशभरातील लाखो मुलांचं IPS किंवा IAS व्हायचं स्वप्न असतं. त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. स्पर्धा परीक्षांसाठी खूप मेहनत करावी लागते. या परीक्षांच्या मेरीटमध्ये येण्यासाठी प्रचंड अभ्यास करावं लागतं. वेगळ्या मानसिक परिस्थितीतून तापून, सुलाखून बाहेर पडावं लागतं. पण जेव्हा तुम्ही ही परीक्षा जिंकता तेव्हा तुमचं स्वप्न पूर्ण होतं. विशेष म्हणजे ज्या राज्यात तुमचा जन्म झालाय, त्याच राज्यात केंद्र सरकारकडून पोस्टिंग मिळाली तर त्यापेक्षा मोठं सुख नाही. अर्थात केंद्र सरकारच्या अखत्यारितील ज्येष्ठ अधिकारी म्हणून संबंधित पदे असल्याने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, दुर्गम भागात काम करण्याचं आव्हान असतं. तशा आव्हानांना सामोरे जाणारे पात्र उमेदवारच या परीक्षेत पास होतात. पण तरीही ज्या राज्यात तुमचा जन्म झालाय त्याच राज्यात जर पोस्टिंग मिळाली तर त्यापेक्षा मोठं भाग्य नाही, असं मानलं जातं. दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसातील ज्या 14 अधिकाऱ्यांना आयपीएस केडर मिळालं आहे ते आता थेट भारतीय पोलीस दलात असतील.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या