मुंबई, 25 मार्च: कोरोना व्हायरस आता हळूहळू संपूर्ण जगात पसरतो आहे. या धोकादायक व्हायरसच्या इन्फेक्शनने भारतीय वंशाचे सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झाला आहे. फ्लॉएड कार्डोज हे 59 वर्षाचे होते. न्यू जर्सीमध्ये राहणारे कार्डोज यांना 19 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. धक्कादायक म्हणजे फ्लॉएड कार्डोज याच महिन्यात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी एक पार्टीही दिली होती. अनेकांना त्यांनी पार्टीला निमंत्रित केले होते. आता कार्डोज यांनी दिलेल्या पार्टीला गेलेल्या प्रत्येकांच्या चिंता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा...कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? काय आहे फोटोमागची कथा
फ्लॉएड कार्डोड यांचे न्यू यॉर्कमध्ये शेज फ्लॉएड, बॉम्बे कॅंटीन आणि ओ पेड्रो नामक रेस्तराँ आहेत. मुंबईसह गोव्यातही फ्लॉएड यांचे रेस्तराँ आहेत. फ्लॉएड काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी एक पार्टीही दिली होती. त्यात जवळपास 200 जण सहभागी झाले होते. न्यू जर्सीला परत गेल्यानंतर फ्लॉएड यांनी व्हायरल फीवर झाला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर टेस्टिंगमध्ये त्यांना कोरोना व्हायरस झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.
हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये धुमश्चक्री, बीडमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला, 9 जणांवर गुन्हाप्रिन्स चार्ल्स कोरोनाच्या विळख्यात..
ब्रिटनला कोरोना व्हायरसने (coronavirus) मोठा धक्का दिला आहे. या व्हायरसने प्रिन्स चार्ल्स (prince charles) यांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांचा मोठा मुलगा 71 वर्षांचे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजसत्तेच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
बकिंघम पॅलेसने जारी केलं आहे की, प्रिन्स ऑफ वेल्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून नाही आलीत. मात्र आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काही दिवस ते निवासस्थानाहूनच काम करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.