मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. अँजिओग्राफीत ब्लॉकेज निघाल्यास पुढील उपचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे देशमुख हे गेल्या अकरा महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये होते. त्यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाने गेल्या आठवड्यात दिलासा दिला होता. ईडीने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. हा विरोध अद्यापही तसाच आहे. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळण्यास अडचणी आहेत. सीबीआयने अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला का विरोध आहे, याबाबतचे काही मुद्दे कोर्टात सादर केले आहेत. अनिल देशमुखांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी त्यांनी जामी अर्ज केला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर सीबीआयने त्यांना जामीन देण्यास विरोध केला होता. याप्रकरणी कोर्टाने सीबीआयला विरोधामागील कारण विचारल होतं. त्याची उत्तर 14 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज सीबीआयने कोर्टात उत्तर सादर केलं आहे. यामध्ये सविस्तर मुद्दे मांडण्यात आले आहेत.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयला केलेल्या विरोधातील प्रमुख मुद्दे : अनिल देशमुख हे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. ते राज्याचे गृहमंत्री होते. 5 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या तारखांना अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नाहीत. तसेच चांदीवाल आयोगाची नियुक्ती ही 1952 च्या कायद्यानुसार नाही. चांदीवाल आयोग हा नियमबाह्य असल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. खरंतक हा सीबीआयचा आरोपच म्हणावा लागले. ( जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीसोबत पत्नीचं संतापजनक कृत्य, प्रियकराच्या मदतीने काटा काढला ) १०० कोटी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनेक मुद्दे मांडले आहे. निवृत्त एपीआय सचिन वाझे याचे 164 अन्वये नोंदवलेले सर्व जबाबात तथ्या असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ACP संजय पाटील यांच्या CRPC161 अंतर्गत जबाबात अनिल देशमुख यांनी नियमबाह्य कलेक्शन करण्याचे आदेश दिले होते, असं स्पष्ट झालं. ACP संजय पाटील आणि अनिल देशमुख यांच्यात व्हाट्सअॅपवर झालेलं याबाबतचं संभाषण स्वत: पाटील यांनी मान्य केलं आहे. या व्हाट्सअॅप चॅटमध्ये HM SIR म्हणून उल्लेख असल्याचं रेकॉर्डवर आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणी पोस्टिंगसाठी कलेक्शन यावर अद्याप तपास सुरू आहे. CBI केसमध्ये सचिन वाझे CRPC306 नुसार माफीचा साक्षीदार हा कायद्यानुसार आहे, असं सीबीआयने म्हटलं आहे.