मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लातूर : जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीसोबत पत्नीचं संतापजनक कृत्य, प्रियकराच्या मदतीने काटा काढला

लातूर : जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीसोबत पत्नीचं संतापजनक कृत्य, प्रियकराच्या मदतीने काटा काढला

मृतक अरविंद यांचा फोटो

मृतक अरविंद यांचा फोटो

दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तपास केला असता मृतकाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं उघड झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Latur, India

लातूर, 14 ऑक्टोबर : आयुष्यात काही नाती खूप महत्त्वाची असतात. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी आपल्यासोबत असले तर आपण आख्खं जग जिंकू शकतो. कारण त्यांच्याकडून मिळणारं मानसिक समाधान आणि आदर हा आपलं आयुष्य जगण्याचा आधार असतो. विशेष म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते. मग ती आई असते किंवा ती पत्नीदेखील असू शकते. आपण आपल्या आई आणि पत्नीकडे सर्व काही बोलून मोकळं होऊ शकतो. पत्नी आपली ही आयुष्यभराची जोडीदार असते. तिचं आपल्या आयुष्यात असण्याला खूप महत्त्व असतं. दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचं कमिटमेंट दिलेलं असतं. पण काही जण विश्वासघात करतात. आपल्या जोडीदाराला धोका देवून निघून जातात. इथपर्यंत तर गोष्टी ठीक आहे. पण काही विचित्र व्यक्ती आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या मदतीने नवरा किंवा पत्नीचा काटा काढतात. तशीच काहीशी घटना लातूरमध्ये घडली आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृतक हा देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे. मृतक अरविंद पिटले त्याच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात वास्तव्यास होता. मृतक हा बेपत्ता असूनही त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार का केली नाही? म्हणून संशयाची पहिली सुई पत्नीवर स्थिरावली. त्यानंतर तिला ताब्यात घेताच तिने तोंड उघडले.

(बुधवार पेठेत जायचा अन् दरवेळी 1 दुचाकी चोरायचा; अखेर 6 महिन्यांनंतर अशी झाली पोलखोल)

देवणी तालुक्यात एका ठिकाणी कामाला असताना मृतक अरविंदची पत्नी आणि घरणी येथील रहिवाशी असलेला सुभाष शिंदे यांचा परिचय झाला. या परिचयातून सुभाष शिंदे हा अरविंदच्या घरी ये-जा करू लागला. सुभाष आणि अरविंदच्या पत्नीची भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध स्थापित झाले. गावात याची वाच्यता सुरु झाली. त्यानंतर सुभाष शिंदे गोड बोलून अरविंद आणि त्याच्या पत्नीला लातुरात घेऊन आला. त्याने दाम्पत्याला खोली करून दिली. त्यानंतर सुभाष शिंदे आणि अरविंदच्या पत्नीला अधिकच मोकळेपणा मिळाला.

दरम्यान, आता दोघांनाही अरविंदचा अडथळा होऊ लागल्याने दोघांनी मिळून अरविंदचा काटा काढायचं ठरवलं. जेवायच्या निमित्ताने दुचाकीवर तिघेही औसा येथील एका धाब्यावर गेले. त्यानंतर बाभळगाव परिसरातील एका कॅनॉलजवळ येऊन दोघांनी मिळून अरविंदचे हातपाय बांधून गळ्यातील गमचाने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकला. या घाईगडबडीत मयत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सोपे झाले. दरम्यात लातूर ग्रामीण पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदे यांना अटक केली आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांत लातूर ग्रामीण पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावलाय.

First published:

Tags: Crime, Latur, Murder