जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Hingoli Car Accident : कार रिव्हर्स घेताना तलावात बुडाली, पोहता येत नसताना प्रचंड प्रयत्न केला पण नियतीला मान्य नव्हतं

Hingoli Car Accident : कार रिव्हर्स घेताना तलावात बुडाली, पोहता येत नसताना प्रचंड प्रयत्न केला पण नियतीला मान्य नव्हतं

Hingoli Car Accident : कार रिव्हर्स घेताना तलावात बुडाली, पोहता येत नसताना प्रचंड प्रयत्न केला पण नियतीला मान्य नव्हतं

हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे कार रिव्हर्स घेताना थेट तलावात जाऊन कोसळली. यातच कारमधील चालक युवकाला पोहता येत नसल्याने तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Hingoli Car Accident)

  • -MIN READ Hingoli,Maharashtra
  • Last Updated :

मनिष खरात (हिंगोली), 08 सप्टेंबर : हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे कार रिव्हर्स घेताना थेट तलावात जाऊन कोसळली. यातच कारमधील चालक युवकाला पोहता येत नसल्याने तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Hingoli Car Accident) चक्रधर गजानन सावळे असे मयत युवकाचे नाव आहे. परवा रात्री आपले दुकान बंद करून गावाकडे परत जाताना औंढा नागनाथ शहरातील गंधकुटी तलावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल दिवसभर शोधाशोध केला परंतु शोध लागला नाही. अखेर काल रात्री उशिरा क्रेनच्या साह्याने तलावामधील कार पोलिसांनी बाहेर काढली आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये असलेल्या औंढा नागनाथ तलावात कार कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. कार रिव्हर्स घेताना थेट तलावात जाऊन कोसळल्याने त्या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. यातच कारमधील चालक युवकाला पोहता येत नसल्याने तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चक्रधर गजानन सावळे असे मयत युवकाचे नाव आहे. परवा रात्री आपले दुकान बंद करून गावाकडे परत जाताना औंढा नागनाथ शहरातील गंधकुटी तलावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल दिवसभर शोधाशोध केला परंतु शोध लागला नाही. अखेर काल रात्री उशिरा क्रेनच्या साह्याने तलावामधील कार पोलिसांनी बाहेर काढली आहे.

हे ही वाचा :  अहमदनगरमध्ये अचानक कलम 144, पोलीस बंदोबस्त वाढवला

औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे चक्रधर सावळेचे औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पूर्वेला टेन्ट हाऊसचे दुकान आहे. बुधवारी रात्री तीनच्या सुमारास चक्रधर बाहेरगावाहून दुकानात आला. त्यावेळी कार रिव्हर्स घेत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट गयातिर्थ तलावात बुडाली. चक्रधर यांनी कारमधून बाहेर पडून पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात

मात्र त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. मात्र त्यात चक्रधर यांचा मृतदेह नव्हता. त्यामुळे तलावात शोध मोहीम सुरु केली असता चक्रधर यांचा मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा :  पुराच्या पाण्यातून तिरडी खांद्यावर घेऊन स्मशानात, यवतमाळचा विदारक VIDEO

त्यानंतर आज सकाळी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात चक्रधर यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात