जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये अचानक कलम 144, पोलीस बंदोबस्त वाढवला

Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये अचानक कलम 144, पोलीस बंदोबस्त वाढवला

Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये अचानक कलम 144, पोलीस बंदोबस्त वाढवला

शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Ahmednagar Police)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 08 सप्टेंबर : शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Ahmednagar Police) याच अनुषंगाने सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी हॉटेल व्यावसायिक चालक मालक यांची बैठक घेत आदेश दिले आहेत. हॉटेल व्यवसायिकांसह ग्रामस्थांच्या बैठकीत सक्त सूचना दिल्या आहेत. शिर्डीत कोणत्याही ओळखपत्राशिवाय रूम मिळत असल्याचे माहिती मिळाल्यास कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले.

जाहिरात

रूम देताना ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रूम दिल्यास 144 सी आर पी एफ कलम तसेच आदेशाप्रमाणे 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यासायिकांचे धाबे दणाणले आहे. तर शिर्डीतील सुरक्षा आढावा घेत अनेक सूचना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बैठकीत केल्या आहेत.

हे ही वाचा :  गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक, एक तरुण फिरत होता जवळ

अहमदनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचे उचलल्याने नागरिकांसह हॉटेल व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क झाले आहेत. यामुळे शिर्डीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसॉर्ट किंवा हॉटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता राहण्यासाठी रुम दिल्यास त्या हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे.

जाहिरात

मागच्याच आठवड्यात दहशतवादी कारवाई

महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथक (ATS), अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून एक मोठी कारवाई केली. शिर्डीतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजिंदर असे असून तो पंजाबमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्याला महाराष्ट्र एटीएसने पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हे ही वाचा :  Cyrus Mistry Accident : ब्रिजच्या चुकीच्या डिझाईनमुळे सायरस मिस्त्रींच्या कारचा अपघात? फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांच्या गाडीला स्फोटके लावून उडवून देण्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नाशिक एटीएस विभागाचे अधिकारी, अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून ही कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात