अकोला, 1 मे : चक्क आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागेमध्ये गांजाची लागवड (Cannabis cultivation) केल्याचा प्रकार अकोल्यात (Akola) समोर आला. हा प्रकार अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयातून (Dhone Ayurveda College) समोर आला आहे. हा कारनामा महाविद्यालयाच्या रखवाल्यानेच (सुरक्षा रक्षक) केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकाने परिसरातील बागेमध्ये तब्बल 142 गांजाच्या झाडांची लागवड केली होती. आता पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करुन सर्व झाड तोडून जप्त केली आहेत. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्याचं प्रकाश सुखदेव सौंधले असं नाव आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या परिसरातील बगीच्यामध्ये गांजाची झाडांची लागवड केली आहे. आर्थिक फायद्यासाठी महाविद्यालयाच्या रखवाल्यानेच गांजाची झाडे लावली. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनही त्याने अवैध पद्धतीने गांजाची लागवड केली. याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जि. श्रीधर विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी काल शनिवारी दुपारी महाविद्यालयाच्या परिसरात कारवाई केली. ( दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार प्ररकणातील आरोपीचा व्हायरल व्हिडीओ, पोलिसांना दिला मोठा इशारा ) या दरम्यान पोलिसांना आरोपीने तब्बल 143 गांजाची झाडे लागवड केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महाविद्यालयचा रखवाला प्रकाश सुखदेव सौंधले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गांजाची झाडांची उंची एक ते सात फुटापर्यंत अशी आहे. ज्याचे वजन 40 किलो ग्रॅम इतके असून जवळपास चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सौंधलेविरुद्ध पातूर पोलिसांत एनडीपीएस अन्वेयनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील, अविनाश पाचपोर आणि इजाज अहमद यांनी केली आहे. गांजा तस्करीसाठी लढवली जाते वेगवेगळी शक्कल… विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून सातत्याने अकोला पोलिसांच्या विशेष पथकाकडून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करांवर कारवाई केली जात आहे. एवढे असूनही गांजा तस्करांनी गांजा विक्रीसाठी वेगवेगळी शक्कल लढवली. जसे मोटर सायकल, प्रवासी बॅग, शेत माल, कापसाच्या ढिगसह अन्य पद्धतीने गांजाची वाहतूक केली गेली. मात्र तरीही अकोला पोलिसांकडून हा गांजा पकडला जात आहे. मध्यंतरी गांजा तस्करांवर याचा मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र आता गांजा तस्कर हे शेतीसह घरोघरी गांजाची लागवड करीत आहेत. या आधीही जिल्ह्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह 405 झाडे जप्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.