Home /News /maharashtra /

'हॅलो, मी अनन्या बोलतेय', जाळ्यात अडकवून बेरोजगार तरुणाची फसवणूक; 92 हजारांना लुटलं

'हॅलो, मी अनन्या बोलतेय', जाळ्यात अडकवून बेरोजगार तरुणाची फसवणूक; 92 हजारांना लुटलं

सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाला तब्बल 92 हजार रुपयांना गंडा घातला आहे. (File Photo)

सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाला तब्बल 92 हजार रुपयांना गंडा घातला आहे. (File Photo)

Cyber Crime in Solapur: सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाला तब्बल 92 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

  सोलापूर, 25 सप्टेंबर: सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाला तब्बल 92 हजार रुपयांना गंडा (fraud Rs 92,000) घातल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणीने ‘नोकरी डॉट कॉम’ (Nokari.Com Fraud) या वेबसाईटच्या नावानं बायोडेटा अपडेट करण्याचा बहाण्यानं तरुणाची ऑनलाइन फसवणूक (Online Money Fraud) केली आहे. आरोपी तरुणीने फिर्यादीला एक लिंक पाठवून अकाऊंटमधील पैसे लंपास केले आहे. याप्रकरणी फिर्यादीने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अनन्या शर्मा (Ananya Sharma) नावाच्या तरुणीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. सागर नवनाथ गायकवाड असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोलापुरातील अवंतीनगर येथील रहिवासी आहे. तर अनन्या शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचं नाव आहे. संबंधित तरुणीने फिर्यादीला फोन करून आपण नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याची माहिती दिली होती. तसेच आपला बायोडाटा अपडेट झाला असून दहा रुपये ऑनलाइन फी भरावी लागेल असं सांगितलं. तसेच त्यासाठी एक लिंकही पाठवली. हेही वाचा-6 तासात मिळालं कर्माचं फळ; साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाची पोलिसांकडून उचलबांगडी नोकरीसाठी संघर्ष करणारा फिर्यादी तरुणही आरोपी तरुणीच्या आमिषाला बळी पडला. त्याने कसलाही विचार न करता, आरोपी तरुणीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं. तसेच दहा रुपये भरण्यासाठी आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली. पण पैसे पाठवता येत नसल्याचं निदर्शनास आलं. हेही वाचा-गाव वसलंही नाही अन् चोरटे हजर; पुण्यात उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपवर डल्ला पण त्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या बँक खात्यातून 9 हजार 978 आणि 10 हजार रुपये वजा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर क्रेडिट कार्डमधून 24 हजार 240 रुपयांचे तीन ट्रान्झिक्शन झाल्याचे मेसेजही आले. आरोपी तरुणीने बँक आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फिर्यादीच्या अकाऊंटमधून एकूण 92 हजार 270 रुपये परस्पर काढून घेतले आहेत. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येता. सागर गायकवाड यांनी त्वरित जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Online fraud, Solapur

  पुढील बातम्या