मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!

शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!

एकनाथ शिंदेंनी मोजक्याच आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि नंतर गुवाहाटीला पोहोचले. ही मोहिम फत्ते केली होती रवींद्र चव्हाण यांनी

एकनाथ शिंदेंनी मोजक्याच आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि नंतर गुवाहाटीला पोहोचले. ही मोहिम फत्ते केली होती रवींद्र चव्हाण यांनी

एकनाथ शिंदेंनी मोजक्याच आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि नंतर गुवाहाटीला पोहोचले. ही मोहिम फत्ते केली होती रवींद्र चव्हाण यांनी

मुंबई, 09 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि नंतर गुवाहाटीला पोहोचले. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली आणि ही मोहिम फत्ते केली होती भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी. आज रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन एका प्रकारे बक्षीस देण्यात आले आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार. (Maharashtra Cabinet Expansion)  आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे. राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण 18 मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी जेव्हा रवींद्र चव्हाण यांचे नाव घेण्यात आले तेव्हा सर्वच भाजपच्या नेत्यांनी टाळ्यावाजून अभिनंदन केलं. रवींद्र चव्हाण यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला आहे. लवकरच खातेवाटप जाहीर होणार आहे. रवींद्र चव्हाण असं फत्ते केलं मिशन लोटस देवेंद्र फडणवीस यांनी ॲापरेशन लोटसची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर दिली होती. रवींद्र चव्हाण हे त्यांच्या २०० कार्यकर्त्यांसह ४ दिवस सुरतमध्ये होते. विधान परीषद मतदाना दिवशी रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंसोबत या सर्व आमदारांची सविस्तर बैठक घेतली होती. विधान परिषद ते सुरत पर्यंत ज्या बसेस आणि खाजगी वाहने अरेंज केली गेली ती वाहने चव्हाण आणि शिंदे यांच्या काही खास माणसांनी केली होती. (Nashik Dadaji Bhuse : शेतकरी ते कॅबीनेटमंत्री दादाजी भुसेंना एकनाथ शिंदेंकडून मैत्री गिफ्ट) आमदार सुरतच्या हॅाटेलमध्ये पोहोचताच चव्हाण यांनी हॅाटेल मध्ये सर्व आमदारांची सविस्तर भेट घेतली. चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक मॅरेथॅान बैठका झाल्या . प्रत्येक क्षणाची अपडेट देवेंद्र फडणवीस यांना दिली जात होती. सुरतनंतर गुवाहाटीला जाण्याचा निर्णय चव्हाण यांनीच सेना आमदारांना सांगितला होता. ('मी त्यांना बघून..', प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक) तसंच मोहित कंबोज हे सुरत मधील पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. गुवाहाटी येथे चव्हाण यांच्यानंतर भाजपचे आणखी एका बडा नेता ठाण मांडून होते. पुढील हालचाली हे दोन नेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावर करत होते. अखेर गुवाहाटीला मुक्काम ठोकला. याच काळात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टाने सुनावणी लांबणीवर टाकली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर गुवाहाटीवरून सर्व आमदार गोव्यात आले आणि तिथून मुंबईत पोहोचले. या सर्व मोहिमेत चव्हाण हे सावली सारखे शिंदे गटासोबत होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या