मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी त्यांना बघून घाबरून पळून आले'; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर हेमांगीनं भावुक होत सांगितली ती आठवण

'मी त्यांना बघून घाबरून पळून आले'; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर हेमांगीनं भावुक होत सांगितली ती आठवण

मराठी सिनेसृष्टीने आज आणखी एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. 'विनोदाचा बादशहा' समजले जाणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

मराठी सिनेसृष्टीने आज आणखी एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. 'विनोदाचा बादशहा' समजले जाणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

मराठी सिनेसृष्टीने आज आणखी एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. 'विनोदाचा बादशहा' समजले जाणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 ऑगस्ट- मराठी सिनेसृष्टीने आज आणखी एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. 'विनोदाचा बादशहा' समजले जाणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्वानांच धक्का बसला आहे. मनोरंजन सृष्टीतले त्यांचे सहकलाकार आज त्यांच्या आठवणीत भावुक झालेले दिसून येत आहेत. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवीने एक इन्स्टा पोस्ट लिहत आपलं मन मोकळं केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ते गिरगावात वास्तव्यास होते. ते बरेच दिवस पडद्यापासून दूर होते.प्रदीप पटवर्धन हे मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते होते. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा त्यांनी आपला ठसा उमठवला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे सह-कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत भावुक होत आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीनेसुद्धा अशीच एक पोस्ट लिहत आपल्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

हेमांगी कवी पोस्ट -

मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत 'celebrity' ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते. कळव्यात कुलकर्णी नावाचे dentist आहेत अगदी माझ्या घराच्या kitchen च्या खिडकी समोर त्यांचं clinic. दुपारची 4 ची वेळ होती आणि माझ्या आईने चहा करत असताना उंचपुऱ्या देखण्या पुरुषाला clinic मध्ये शिरताना पाहिलं. मला आईने बोलवुन घेतलं आणि सांगितलं अगं त्या clinic मध्ये प्रदीप पटवर्धन शिरलेत बहुतेक. मी म्हटलं ह्या काही काय? एवढा मोठा माणूस इथं कशाला येईल? आई म्हणाली अगं नाही तेच आहेत. शहानिशा करायला म्हणून मी गेले clinic जवळ आणि तेवढ्यात clinic चं दार उघडून एक प्रचंड handsome व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर चालत आलं. पहिला अभिनेता ज्याला मी इतकं जवळून पाहिलं होतं. काळजात धस्स झालं. काय बोलावं काय करावं सुचेना. आठ नऊ वर्षाची मी त्यांना बघून घाबरून पळून आले आणि आईला सांगितलं अगं तेच आहेत!!!!! दुसऱ्या दिवशी शाळेत मी जाम shining मारली होती.

(हे वाचा:Pradeep Patwardhan Death: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन )

मग त्यांनतर अनेक वेळा त्यांना त्या clinic मध्ये जाताना येताना पाहिलं.खूप वर्षांनी या क्षेत्रात आल्यावर त्यांच्या सोबत काम करायची संधी ही मिळाली. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हा किस्सा त्यांना सांगितला. मी म्हटलं "मी तुम्हांला पाहिलं होतं लहानपणी" त्यावर पट्या काका म्हणाले "कुणाच्या लहानपणी?", "माझ्या की तुझ्या?"मी म्हटलं "अहो माझ्या" तर त्यांच्या विशिष्ट अशा style मध्ये मानेला झटका देऊन म्हणाले "हां मग ठिके, मी उगाच घाबरलो!"माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण घरी आल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचं होतं! असा मिश्किल, handsome आणि timing चा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन!Will Miss you!''.

First published:

Tags: Entertainment, Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment