पुणे, 24 मे: शनिवारी धनकवडी (Dhankawadi) गावठाण परिसरातील पाटीलनगर याठिकाणी एका इमारतीत एकट्या राहणाऱ्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही हत्या (Woman murder)नेमकी कोणी केली आणि का केली? या प्रश्नांनी पोलिसांना गांगारून टाकलं होतं. पण पोलिसांनी काही तासांतच हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिअर बारमध्ये काम करणाऱ्या एका वेटरला ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशी करत असताना आरोपी वेटरनं हत्येचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. अविनाश विष्णू साळवे (वय-27) असं अटक केलेल्या युवकाचं नाव असून तो धनकवडी परिसरातील पाटीलनगर याठिकाणी राहतो. तर कल्पना घोष (वय-32) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून त्याही धनकवडी परिसरातील एका इमारतीत एकट्या राहत होत्या. मुळच्या पश्चिम बंगाल येथील रहिवासी असणाऱ्या कल्पना घोष यांची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं होतं. पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाली ही स्पष्ट होतं नव्हतं. अंगावर थुंकल्यामुळे केली हत्या सहकारनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धनकवडीतील एका बिअर बारमध्ये काम करणाऱ्या अविनाश साळवे याला मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. आरोपी साळवे हा संबंधित बिअर बारमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तर मृत कल्पना घोष यांना दारुचं व्यसन होतं. त्यामुळे घोष आरोपी साळवेला फोन करून दमदाटी करून त्याच्याकडून दारू मागवत असतं. तर दोन दिवसांपूर्वी मृत घोष यांनी आरोपी साळवेला शिवीगाळ केली होती. तसेच त्याच्या अंगावर थुंकली होती. हे ही वाचा- हात-पाय बांधून दलित तरुणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितलं असता पाजलं मूत्र हाच राग सहन न झाल्यानं आरोपी साळवेनं धारदार शस्त्रानं वार करून कल्पना घोष यांची हत्या (waiter took revenge for spitting on body) केली होती. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्येचा उलगडा केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.