जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणणार', अशोक चव्हाणांनी केला संकल्प!

'मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणणार', अशोक चव्हाणांनी केला संकल्प!

'कोणालाही टीका करण्याची संधी मिळणार नाही अशी कामे होतील, पण ज्यांना कावीळ झाली आहे. त्यांचं मी काही करू शकत नाही'

'कोणालाही टीका करण्याची संधी मिळणार नाही अशी कामे होतील, पण ज्यांना कावीळ झाली आहे. त्यांचं मी काही करू शकत नाही'

‘कोणालाही टीका करण्याची संधी मिळणार नाही अशी कामे होतील, पण ज्यांना कावीळ झाली आहे. त्यांचं मी काही करू शकत नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड, 29 मार्च : ‘मराठवाड्यात बुलेट ट्रेन (Bullet train) आणण्याच माझं स्वप्न आहे. मी स्वप्न बघतो आणि पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो’ अस वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केलं. तसंच, चांगले काम केली तरी लोक टीका करता, त्यांना कावीळ झाला आहे, त्याचे काही करू शकत नाही, असं म्हणत भाजप आमदाराला टोला लगावला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 150 कोटीच्या  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते. ‘नांदेडहुन हैदराबाद आणि जालन्याहुन पुणे-मुंबईपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. त्याच मार्गावरून बुलेट ट्रेन मराठव्याडा आली पाहिजे असं माझं स्वप्न आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष देणारेही हवी आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले. ( उन्हाळ्यातही का होतो सर्दी-खोकल्याचा त्रास? काय आहे उपाय? ) ‘नांदेडसाठी चांगलं काम केलं की, टीका टिपणी करणारे आहेत. ते आपल्या नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी नाव न घेता आमदार प्रशांत बंब यांच्यावर टीका केली. ‘नांदेडसाठी तुमच्या सरकारने काय केले ते बोला, नंतर नांदेड विषयी चर्चा करा, आम्ही जिल्ह्यासाठी चांगलं काम केलं की त्याला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे. नांदेडमध्ये जी काम होतील ती चांगल्या प्रतिची आणि पारदर्शक होतील, असा दावा देखील अशोक चव्हाण यांनी केला. ( पाच गोळ्या लागूनही सोडली नाही हिंमत; युक्रेनहून परतलेल्या हरजोतची आपबिती ) ‘कोणालाही टीका करण्याची संधी मिळणार नाही अशी कामे होतील, पण ज्यांना कावीळ झाली आहे. त्यांचं मी काही करू शकत नाही, असं सांगत अशोक चव्हाण यांनी प्रशांत बंब याच्यावर निशाणा साधला. ‘जलनेवाले जलते रहे आमचं काम थांबणार नाही’ असा शेर देखील अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगितला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात