दिल्ली, 2 9 मार्च: उन्हाळ्यात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होतो हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं. परंतु, हे खरं आहे. कडक उन्हाळ्यातही काही लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. ही एक सामान्य समस्या आहे जी थंडी आणि ऊन लागल्यामुळे होते. उन्हाळ्यात सर्दी (Summer cold) ही एन्टरोव्हायरसमुळे (Enteroviruses) होते. संक्रमित व्यक्ती आणि वस्तूंच्या संपर्कातून त्याचा प्रसार होतो. शिंका येणं, नाक वाहणं किंवा बंद होणं, खोकला, घसा खवखवणं, छाती आणि घसा जाम होणं ही उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दीची काही लक्षणं आहेत. मात्र जास्त ताप किंवा पुरळ दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही घरगुती उपायांनीदेखील (Home Remedies For Summer Cold) तुम्हाला उन्हाळ्यातील सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यावरील घरगुती उपाय
उन्हाळ्यात थंडीचा त्रास होत असेल तर तुम्ही सलाईन स्प्रे वापरू शकता. यासाठी एक कप पाणी, चिमूटभर बेकिंग सोडा, सैंधव आणि सलाईन स्प्रे बॉटल घ्या. पाणी गरम करून त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा आणि एक चमचा सैंधव टाका. हे मिश्रण सलाईन स्प्रे बॉटलमध्ये भरून चांगले मिक्स करा. नंतर काळजीपूर्वक नाकामध्ये (Nostrils Spray) स्प्रे करा. यामुळे बंद झालेल्या नाकपुड्या मोकळ्या होतात आणि नाकामध्ये गोठलेला मेकुड सहज निघून जातो.
अॅपल सीडर व्हिनेगर हादेखील उन्हाळ्यातील सर्दी दूर करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सीडर व्हिनेगर टाला. दिवसातून दोन ग्लास हे पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यामुळे झालेला कफ कमी होतो. अॅपल सीडर व्हिनेगरचं पाणी शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी असतं.
उन्हाळ्यातील थंडीपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या किंवा व्हिटॅमिन सीयुक्त फळं भरपूर प्रमाणात खावीत. व्हिटॅमिन सी विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवतं. यामुळे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात.
उन्हाळ्यात सर्दी, खोकल्याची समस्या वारंवार होत असेल तर आल्याचं सेवन अवश्य करावं. आल्याचा चहा, काढा किंवा आलं घातलेलं गरम पाणी प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून अराम मिळतो. याची चव वाढवण्यासाठी त्यात थोडा मध किंवा गूळदेखील घालू शकता. आल्यामध्ये असलेले अँटिव्हायरल घटक नाकातील जळजळ कमी करतात आणि मेकुड तयार होऊ देत नाही.
पाहा - Photo टाकताच इंटरनेट सेनसेशन झाली भारतीय खेळाडूची मुलगी, लोक म्हणाले 'काय ऍटिट्यूड आहे'
एक ग्लास कोमट पाण्यात हळद, मीठ मिसळून गुळण्या केल्यानेदेखील उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दीपासून अराम मिळतो. ही क्रिया दिवसातून 2 ते 3 वेळा करा. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन तत्त्व इन्फेक्शन, अॅलर्जी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटिमायक्रोबायल घटक असतात जे सूज कमी करण्यास मदत करतात. हळदीमुळे सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून लवकर अराम मिळतो. याशिवाय लाल कांदा, मध, लसूण, हर्बल टी, हळद दूध, दालचिनीचं पाणी इत्यादींचं सेवन केल्यानेदेखील उन्हाळ्यातील सर्दी-खोकल्यापासून अराम मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.