मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा, सेना-भाजपची सहमती

ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा, सेना-भाजपची सहमती

या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा...

या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा...

या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा...

  • Published by:  sachin Salve

ठाणे, 08 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरण प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून रखडलेला होता. अखेर आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत (thane municipal corporation) शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्ताव आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. पण या प्रस्तावावरून बराच गोंधळ झाला. तब्बल तीन वेळा सभा तहकूब करण्यात आली होती. तसंच एक वेळा हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला होता. पण अखेर  बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला  सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.  या महत्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलिसांच्या जाचाला कंटाळून शाळकरी मुलाची आत्महत्या, नगरमध्ये खळबळ

या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले.

गॅस संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला, तिसऱ्या दिवशी पुन्हा केले अंत्यसंस्कार

दरम्यान, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाल्यापासून हा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पातील १२ स्टेशन्सपैकी ८ स्टेशन्स गुजरातेत असल्यानं या प्रकल्प गुजरातच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.

महाराष्ट्रात येणारी स्थानकं

१) बीकेसी

२) ठाणे

३) विरार

४) बोईसर

या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पदरात या गोष्टी पडतील अशी म्हटले जातंय. बुलेट ट्रेनच्या कामामुळे रोजगार संधी उपलब्ध होई. बुलेट ट्रेनच्या कामामुळे त्या मार्गावरील गृहनिर्माण उद्योगाला बळ मिळेल. बुलेट ट्रेनच्या मार्गावर लॉजिस्टिक्स हब तयार होतील. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतील. मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावरील भार कमी होईल.

या प्रकल्पामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला काय तोटा होऊ शकेल ?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी या ओळखीला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. देशाचा आर्थिक तराजू गुजरातच्या बाजूने झुकल्यास मुंबईच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे.  हिऱ्याचा व्यापार गुजरातकडे वळण्याची शक्यता आहे. तसंच, या प्रकल्पात मुंबईला चारच स्थानकं पण गुजरात इतकाच २५ टक्के पैसा द्यावा लागणार

कशी असेल बुलेट ट्रेन

१) मुंबई-अहमदाबाद मार्ग: ५०८ किलोमीटर

४६८ किलोमीटर उन्नत मार्ग  

२) किती वेळ लागेल: अंदाजे अडीच तास

३) प्रकल्पाचा खर्च: एक लाख आठ हजार कोटी

४) महाराष्ट्रातील स्थानकं: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर

५) गुजरातमधील स्थानकं: वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती

६) काय असेल बुलेट ट्रेनचा वेग: किमान ३२० किमी प्रतीतास

७) कमाल वेग: ३५० किमी प्रतितास

First published: