बुलडाणा, 14 मार्च : बुलाडाण्यातील (Buldhana) खामगाव महामार्गावर (Khamgaon Highway) रस्ता ओलांडत असताना भरधाव लक्झरी बसने (private bus) तीन चाकी मालवाहू रिक्षाला (auto rickshaw) जोरात धडक दिली. या भीषण अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली खामगाव मार्गावरील पेठ गावाजवळ ही घटना घडली. किशोर गजानन इंगळे असं अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
किशोर इंगळे आपली मालवाहू रिक्षा घेऊन चालले होते. रस्ता ओलांडत असताना समोरून एक भरधाव खासगी ट्रॅव्हल्सची बस येत होती. किशोर इंगळे यांनी रिक्षा रस्त्याच्या मधोमध आल्यानंतर भरधाव बसने वाचवण्याचा प्रयत्न केला पण यात रिक्षाला जबर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा यात चुराडा झाला आहे. तर रिक्षाचालक किशोर इंगळे हे दूरपर्यंत फेकले गेले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर बस काही अंतरावर जाऊन थांबली होती.
हेही वाचा - सर्वात मोठी बातमी, 'ती' इनोव्हा कार मुंबई पोलीस आयुक्तालया जवळून घेतली ताब्यात!
स्थानिक लोकांनी धाव घेऊन किशोर इंगळे यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रिक्षाचालक किशोर इंगळे यांच्या अपघाती निधनामुळे इंगळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Autorickshaw driver, Death, Private bus, अपघात, बुलडाणा