राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 23 एप्रिल : साखरपुड्यासाठी (Sakharpuda) निघालेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्यासाठी जाताना वाटेत भीषण अपघात (major accident) झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावातून (Mehkar village Buldhana) जाणाऱ्या नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा देवी गावाजवळ हा अपघात झाला आहे. नागपुर-मुंबई हायवेवर चिंतामणी (सनी नागपूर) ट्रॅव्हल्स गाडी आणि अल्टो कार यांची समोरासमोर धडक झाली. अल्टो कारमध्ये 5 व्यक्ती होते त्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी आहेत. अल्टो कार ही चाळीसगाव येथील आहे. अल्टो कारमधून हे सर्व नागरिक डिग्रस येथे साखरपुडा समारंभासाठी जात असतांना हा अपघात झाला आहे. अल्टो कारमधील इंदल चव्हाण, योगेश विसपुते, विशाल विसपुते यांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीडमध्ये ट्रक आणि क्रुझरच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू अंबाजोगाई - लातूर महामार्गावर भीषण अपघात (major accident on Ambajogai - Latur highway) झाला आहे. महामार्गावरील नंदगोपाल दूध डेअरीजवळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक - क्रुझरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर ट्रक आणि क्रुझर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतक हे सर्व लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जण आज सकाळी नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली. अद्याप मयताची नावे समोर आली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







