बीड, 23 एप्रिल : अंबाजोगाई - लातूर महामार्गावर भीषण अपघात (major accident on Ambajogai - Latur highway) झाला आहे. महामार्गावरील नंदगोपाल दूध डेअरीजवळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक - क्रुझरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार (7 people died on the spot) झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर ट्रक आणि क्रुझर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतक हे सर्व लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
हे सर्व जण आज सकाळी नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली. अद्याप मयताची नावे समोर आली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. वाचा : वीट आणि दगडांनी एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं खळबळ या अपघातात जखमी झालेल्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मावळमध्ये खड्डा आला अन् डोळ्यादेखत मित्र टँकरखाली चिरडला गेला रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात टँकरच्या धडकेत झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तळेगाव-चाकण राष्ट्रीय मार्गावर ही घटना घडली. गॅस टँकरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इंदोरी टोलनाक्याजवळ ही घटना घडली. जितेंद्र रजनीकांत माजदूम ( रा.कोल्हापुर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत जितेंद्र हा तरुण वासुली फाटा येथे एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. मयत जितेंद्र आणि त्याचा मित्र विजय ढाकणे हे दोघे तरुण दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवताना पाठीमागून येणारा गॅस टँकरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. अचानक टँकरची धडक बसल्यामुळे दुचाकी चालवत असताना नियंत्रण सुटले आणि दोघेही खाली पडले. याचवेळी जितेंद्र हा गॅस टँकरच्या चाकाखाली सापडला गेला. त्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातून विजय ढाकणे थोडक्यात बचावला. मात्र, डोळ्या देखत मित्राचा मृत्यू झाल्यामुळे विजय ढाकणे पुरता हादरून गेला. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

)







