जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : '..त्यामुळे झाला अपघात'; बस चालक दानिश शेखचा मोठा दावा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Buldhana Bus Accident : '..त्यामुळे झाला अपघात'; बस चालक दानिश शेखचा मोठा दावा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख पोलिसांच्या ताब्यात

अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख पोलिसांच्या ताब्यात

अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितलं आहे, की बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, हे तपासानंतरच समोर येईल.

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

बुलढाणा 01 जुलै : समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव अपघातावेळी झोपला होता. दुसऱ्या ड्रायव्हरलाही किरकोळ दुखापत झालेली आहे. अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितलं आहे, की बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, हे तपासानंतरच समोर येईल. अपघातग्रस्त गाडीचे सर्व टायर जळून खाक झाले आहेत. टायर फुटल्याचा काहीही पुरावा किंवा निशाणी घटनास्थळी मिळालेली नाही. त्यामुळे खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागली होती ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बसचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Buldhana Bus Accident : बसला आग लागताच चालक-कंडक्टर काच फोडून पळाले; अपघातातून वाचलेल्यांनी सांगितलं ‘नेमकं काय घडलं?’ अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. बसला आग लागताच यातील 8 प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुर्दैवी 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आता हा आकडा 26 वर पोहोचला असल्याचंही समोर येत आहे. डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले प्रवासी संभाजीनगरचे असल्याचं समोर आलं आहे. -

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात