बुलडाणा, 26 फेब्रुवारी : बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हात उसने अथवा घरगुती कामासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करता न आल्याने सावकारांनी अक्षरश: पिळवणूक चालवली आहे. बुलडाणा जिल्ह्यात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान एका शेतकऱ्यांने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्याने अवैध सावकाराकडून गरजेसाठी पैसे घेतले होते. दरम्यान त्या शेतकऱ्याने घेतलेली रक्कम व्याजासह परत दिली होती. यानंतरही सावकाराकडे ठेवलेली शेतजमीन सावकार सोडून देण्यास नकार देत होता. यामुळे चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील सुधाकर श्रीराम मिसाळ (वय 55) वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
'प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं..' भाजप नेत्याचा थेट हल्ला म्हणाले, आधी MIM अन् आता..
यामुळे ग्रामीण भागातील अवैध सावकारीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेळगाव आटोळ येथील शेतकरी सुधाकर श्रीराम मिसाळ असे या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. अवैध सावकार शेळगाव आटोळ येथीलच आहे. त्याने सुधाकर मिसाळ यांची जमीनही बळजबरीने हडप केल्याची माहिती पुढे येत आहे.
या सावकाराविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मिसाळ यांच्या नातेवाईकांनी आणि शेतकऱ्यांनी चिखली उपजिल्हा रूग्णालयातच काल सायंकाळी ठिय्या मांडला होता.
चुकीला माफी नाही! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश
तर रात्री उशिरा अंधेरा पोलिसांत अवैध सावकार विरुध्द पत्नी सिंधुबाई सुधाकर मिसाळ यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोस्टेला अवैध सावकार अनिल दौलत तिडके याचेविरूध्द कलम 306 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news, Crime news, Person suicide